शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वंदेमातरम् स्पर्धेमुळे देशभक्तीचा भाव जागृत होईल

By admin | Updated: August 10, 2015 23:28 IST

प्रवीण दटके : पहिल्या फेरीत तीन शाळांची निवड

प्रवीण दटके : पहिल्या फेरीत तीन शाळांची निवड
नागपूर : वंदेमातरम् हा स्वातंत्र्य लढ्याचा मूलमंत्र असून त्याच्या सामूहिक गायनाने विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीचा भाव जागृत होईल, असे प्रतिपादन महापौर प्रवीण दटके यांनी सोमवारी केले. मनपाच्या शिक्षण विभागातर्फे शिक्षक संघाच्या अध्यापक भवन येथे आयोजित महापौर चषक वंदेमातरम् समूहगान स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, शिक्षण समितीचे सभापती गोपाल बोहरे, क्रीडा समितीचे सभापती हरीश दिकांेडवार, शिक्षणाधिकारी अशोक टालाटुले, स्पर्धेचे परीक्षक मोरेश्वर निस्ताने, पुरुषोत्तम ताईसकर व अनिता तोटेवार आदी उपस्थित होते.
मनपाच्या शिक्षण विभागामार्फत १९९५ सालापासून ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती अशोक टालाटुले यांनी प्रास्ताविकातून दिली. ही स्पर्धा तीन गटात विभागली असून पहिल्या गटात वर्ग ९ व १० च्या विद्यार्थ्यांची पहिली फेरी पार पडली. यात २७ शाळांनी सहभाग घेतला. त्यातून विमलताई तिडके विद्यालय, आर.एस. मुंडले, साऊ थ पॉईंट व मनपाची दुर्गानगर येथील माध्यमिक शाळा आदींची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. या शाळेतील स्पर्धकांनी प्रत्येकी एक देशभक्तीपर गीत सादर केले.
११ ऑगस्टला दुसऱ्या गटातील वर्ग ६ ते ८, १२ तारखेला तिसऱ्या गटातील वर्ग १ ते ५ विद्यार्थ्यांची पहिली फेरी होणार आहे. स्पर्धेची अंतिम फेरी १४ ऑगस्टला होणार असून समारोप १४ ऑगस्टला दुपारी १ वाजता आयएमए हॉल येेथे केला जाईल. यावेळी विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे.
कार्यक्रमाला शिक्षण विभागाचे रवी खंडाईत, देवीदास बतकी, जितेंद्र गायकवाड, राहुल गायकी, संजय भुरे आदी उपस्थित होते. संचालन अरुणा गावंडे यांनी तर आभार विजय इमाने यांनी मानले.(प्रतिनिधी)