नवी दिल्ली - कामाख्या-हावडा या पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या यशस्वी लाँचिंगनंतर, आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई आणि केएसआर बेंगळुरू दरम्यान नवीन 'वंदे भारत स्लीपर' ट्रेनला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे दक्षिण आणि पश्चिम भारताला जोडणारी रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक वेगवान आणि आरामदायी होणार आहे.
बेंगळुरू सेंट्रलचे भाजप खासदार पी. सी. मोहन यांनी या संदर्भात केलेल्या मागणीला प्रतिसाद देताना रेल्वेमंत्र्यांनी ५ एप्रिल २०२६ रोजी पत्राद्वारे ही महत्त्वाची घोषणा केली. ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) आणि केएसआर बेंगळुरू स्थानकांदरम्यान धावणार आहे.
केंद्र सरकारच्या वेगवान उत्पादन आराखड्यानुसार, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डिसेंबर २०२६ पर्यंत एकूण १२ नवीन वंदे भारत स्लीपर रेक सादर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
लातूरच्या कारखान्यात ‘फर्स्ट एसी’ची झलकमहाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे, लातूर येथील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये या गाड्यांची निर्मिती केली जात आहे. आरव्हीएनएल आणि रशियन कंपनी टीएमएच यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘कायनेट रेल्वे सोल्यूशन्स’ने नुकताच वंदे भारत स्लीपरच्या ‘फर्स्ट एसी’ डब्याचा डिझाइन कन्सेप्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे.हे आलिशान डबे प्रवाशांना विमान प्रवासासारखा अनुभव देतील, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.
Web Summary : Mumbai and Bengaluru will soon be connected by a new 'Vande Bharat Sleeper' train. Railway Minister approved the project following demand from a Bengaluru MP. The train, manufactured in Latur, aims to provide a luxurious travel experience by December 2026.
Web Summary : मुंबई और बेंगलुरु जल्द ही एक नई 'वंदे भारत स्लीपर' ट्रेन से जुड़ेंगे। रेल मंत्री ने बेंगलुरु के एक सांसद की मांग के बाद परियोजना को मंजूरी दी। लातूर में निर्मित, ट्रेन का लक्ष्य दिसंबर 2026 तक एक शानदार यात्रा अनुभव प्रदान करना है।