व्हॉल्व दुरुस्तीलाच लागले २९ तास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2016 22:24 IST
(पाणीपुरवठा बातमीला जोड)
व्हॉल्व दुरुस्तीलाच लागले २९ तास
(पाणीपुरवठा बातमीला जोड)मनपा वाघूर पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला लागलेली गळती दुरुस्त करण्यासाठी पाईप बदलावा लागला. त्यासाठी पाणीपुरवठा विभागाने ३० तास लागतील असे नियोजन केले होते. त्यानुसार त्या कालावधीत हे काम पूर्ण झाले. मात्र त्यानंतर व्हॉल्व सुरूच झाला नाही. तो उघडण्याच्या प्रयत्नात चाव्या तुटत होत्या. त्याचा गिअर बॉक्स काढून पाहिला. मात्र व्हॉल्वची झडप निघत नव्हती. ज्या मक्तेदाराला दुरुस्तीचे काम दिले होते. त्याच्याव्यतिरिक्त आणखी दोन मक्तेदारांची मदतही घेण्यात आली. मात्र यश न आल्याने अखेर व्हॉल्व काढून टाकून पाईप जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्ण व्हॉल्व क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आला. अखेर शुक्रवारी दुपारी १२ वाजता हे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले.