शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅलेंटाईन डे-३

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

कौटुंबिक वातावरण

कौटुंबिक वातावरण
शहरातील उद्यानांमध्ये आज प्रेमीयुगुलांऐवजी संपूर्ण कुटुंबासह आलेल्यांची संख्या अधिक होती. सेमिनरी हिल्स, तेलंगखेडी, अंबाझरी आदी उद्यानातच एरवी आढळून येणाऱ्या प्रेमीयुगुलांची संख्या आज कमी होती. त्याऐवजी कुटुंबासह उद्यानात हजेरी लावणारे अधिक होते. पती-पत्नी आपल्या चिमुकल्यांना घेऊन उद्यानात आले होते. अनेकांनी तर आपल्यासोबत जेवणाचे डबे आणले होते. हिरव्यागार गवतावर बसून कुटुंबासह भोजनाचा आस्वाद घेताना अनेक कुटुंबीय आढळून आले. तर मोठे व्यक्ती भोजन करीत असताना उद्यानातील खेळण्यांवर बालक मनसोक्त खेळत होती. बहुतांश उद्यानांमध्ये असेच वातावरण होते. बालोद्यानात आज पोलिसांचा कडा पहारा असल्याने हैदोस घालणारे फिरकलेच नाही. त्यामुळे उद्यानात येणाऱ्यांमध्ये कुठलीही भीती नव्हती. आजच्या दिवशी प्रेमीयुगुलांपेक्षा कुटुंबासह येणाऱ्यांची संख्याच अधिक असल्याचे बालोद्यानमध्ये पार्किंगचा व्यवसाय करणारे साहिल खान यांनी सांगितले.
-गुंडगिरीने व्यवसाय बुडाला
चार-पाच वर्षांपूर्वी व्हॅलेंटाईन डेला विरोध मोठ्या प्रमाणावर होत होता. परंतु नंतर ते बंद झाले. आता पुन्हा आक्रमकता वाढली आहे. शुक्रवारी अचानक काही तरुणांनी येऊन उद्यानात हैदोस घातला. काही तरुणींची छेडही काढली. ही कुठली संस्कृती आली. यामुळे आमच्यासारख्या लोकांचा व्यवसाय मात्र बुडाला आहे. व्हॅलेंटाईन डेला चांगली गर्दी असते. त्यामुळे पार्किंगमधून व खाद्यपदार्थांच्या विक्रीतून चांगली कमाई होते. मात्र कालच्या गुंडागर्दीच्या प्रकरणामुळे उद्यानामध्ये आज फारसे लोक फिरकलेच नाही. त्यामुळे व्यवसाय बुडाला असल्याचे बॉटनिकल गार्डनमधील पार्किंग चालक पिंटू शहाकार यांनी सांगितले.