शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्र्यांच्या मोटारीवर चढले वाघोबा!

By admin | Updated: September 22, 2016 01:16 IST

वरुडचा थरार : दहा मिनिटे दिला ठिय्या

वरुडचा थरार : दहा मिनिटे दिला ठिय्या
अशोक पिंपरे
राळेगाव (यवतमाळ) : स्थळ - वरुड रस्त्यावरील जंगल. वेळ रात्री आठची. पट्टेदार वाघ अचानक वाहनापुढे उभा. चालकाने प्रसंगावधान राखून काचा वर घेतल्या. धिप्पाड वाघ दोनदा वाहनावर चढला. दहा मिनिटे ठिय्या देऊन मग जंगलात मार्गस्थ झाला. माजी मंत्री आणि विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रा. वसंतराव पुरके यांनी मंगळवारी हा थरार अनुभवला. यामुळे या परिसरात पट्टेदार वाघाचा संचार असण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
प्रा. पुरके मोहदा येथून राळेगावकडे येत होते. वरुडलगतच्या जंगलातून रस्त्यावर अचानक पट्टेदार वाघ आला. हा धिप्पाड वाघ पाहून वाहन चालकाची पाचावर धारण बसली. मात्र प्रसंगावधान राखून त्याने वाहन थांबवित तत्काळ काचा वर केल्या. वाहनात प्रा. पुरके आणि त्यांचे पाच कार्यकर्ते होते. एक-दोन मिनिटात वाघ निघून जाईल, असा त्यांचा अंदाज होता. मात्र या वाघाने तब्बल दहा मिनिटे तेथेच तळ ठोकला. तो दोनदा वाहनावर चढला. एकदा तर प्रा. पुरके बसलेल्या खिडकीजवळ जाऊन काचेतून पाहू लागला. जीव मुठीत घेऊन सर्वजण मोटारीत शांतपणे बसून राहिले. दहा मिनिटानंतर हा वाघ रस्त्याच्या कडेने चालत जंगलात निघून गेला आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला.
या भागात वाघाच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत. दोघांना जीव गमवावा लागला. आज माझ्या वाहनापुढे वाघ आला. आपणही वाघाचे भक्ष झालो असतो. त्यामुळे वाघ पकडण्याची मोहीमेला गती द्या, अशी सूचना पुरके यांनी वन खात्याला दिल्या आहेत.
.................
बॉक्स
असाही योगायोग
प्रा.वसंतराव पुरके खैरगाव कासार येथे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात असताना वरुड जवळ त्याच पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. हा विलक्षण योगायोग पुरके यांना अनुभवावा लागला.