नवी दिल्ली : ब्रिक्स गटातील पाच उदयोन्मुख अर्थव्यवस्थेच्या देशांनी स्थापन केलेल्या ‘न्यू डेव्हलपमेंट बँके’च्या प्रमुखपदी प्रसिद्ध बँकर के. व्ही. कामत यांची नियुक्ती झाली. ५० अब्ज अमेरिकन डॉलरच्या या बँकेचे प्रमुखपद कामत यांच्याकडे पाच वर्षे राहील व बँकेचे कामकाज वर्षभरात सुरू होईल, असे अर्थ सचिव राजीव मेहरिषी यांनी सांगितले. भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात माठ्या आयसीआयसीआय बँकेचे कामत अध्यक्ष आहेत.ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेने (ब्रिक्स) गेल्या वर्षी न्यू डेव्हलपमेंट बँक (एनडीबी) स्थापन करण्याचा करार केला होता.
के. व्ही. कामत ‘ब्रिक्स’चे अध्यक्ष
By admin | Updated: May 12, 2015 05:45 IST