शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

उत्तरप्रदेशातील सत्ताधारी समाजवादी पक्ष फुटीच्या उंबरठयावर

By admin | Updated: December 30, 2016 15:29 IST

उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्ष फुटीच्या उंबरठयावर पोहोचला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांचे पिता पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांच्यातील...

 ऑनलाइन लोकमत 

लखनऊ, दि. 30 - उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्ष फुटीच्या उंबरठयावर पोहोचला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांचे पिता पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांच्यातील तिकीट वाटपावरुन तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी मुलायमसिंह यादव यांनी सपाच्या 325 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यावेळी अखिलेश समर्थकांची नावे यादीतून वगळण्यात आल्याची चर्चा होती. 
 
अखेर अखिलेश यादव यांच्या संमतीने गुरुवारी रात्री उशिरा 235 उमेदवारांची यादी तयार झाली आहे. ही यादी ते कुठल्याही क्षणी जाहीर करु शकतात. असे घडल्यास समाजवादी पक्षाची दोन शकले पडतील. ज्यांना तिकीट मिळाले आहे त्या सर्व उमेदवारांची उद्या सकाळी 10.30 वाजता मुलायमसिंह यादव यांनी बैठक बोलवली आहे. 
 
उद्या होणारी सपाची बैठक महत्वपूर्ण ठरणार आहे. मुलायमसिंह यादव उमेदवारांच्या भावना जाणून घेतील तसेच यादीचा फेरआढावाही घेतला जाईल. सपावर नियंत्रण मिळवण्यावरुन शिवपाल यादव आणि अखिलेश यादव यांच्यातील संघर्षातून पक्ष फुटीच्या उंबरठयावर पोहोचला आहे. अखिलेश यांचे समर्थन असलेली 235 उमेदवारांची यादी सोशल मीडियावर फिरत आहे. यावर कुठलीही स्वाक्षरी नाही. सपाचे तिकीट न मिळालेल्या एका अखिलेश समर्थकाने  ही यादी पोस्ट केली आहे.