शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात उमलणार कमळ, टाइम्स नाऊच्या सर्व्हेत भाजपाला 202 जागा

By admin | Updated: January 31, 2017 17:45 IST

उत्तर प्रदेशमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता जोर पकडला आहे. तिकिट वाटपावरून पक्षात असलेली नाराजी

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 -  उत्तर प्रदेशमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता जोर पकडला आहे. तिकिट वाटपावरून पक्षात असलेली नाराजी आणि सपा-काँग्रेस आघाडीने समोर उभे केलेले तगडे आव्हानामुळे अडचणींसा सामना करत असलेल्या भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशातील निवडणुकांबाबत दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भाजपा स्वबळावर बहुमत मिळवेल असा अंदाज टाइम्स नाऊ आणि व्हीएमआर यांच्या सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे.  या सर्व्हेत भाजपा स्वबळावर 202 जागा जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या सर्व्हेनुसार 403 सभासद असलेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभेत भाजपाला 34 टक्के मतांसह 202 जागा मिळतील. 2012 साली झालेल्या विधानभा निवडणुकीत भाजपाला अवघ्या 47 जागा मिळाल्या होत्या. त्या तुलनेत हा आकडा कैक पटीने मोठा आहे. 
मात्र सध्या उत्तर प्रदेशात सत्ताधारी असलेल्या समाजवादी पार्टीला काँग्रेसशी आघाडी केल्यानंतही फार मोठा लाभ होताना दिसत नाही आहे. सपा आणि काँग्रेसच्या आघाडीला या निवडणुकीत 31 टक्के मतांसह 147 जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. तर उत्तर प्रदेशच्या सत्तेत पुनरागमन करण्यासाठी इच्छुक असलेल्या मायावतींच्या बसपाला केवळ 24 टक्के मतांसह 47 जागा मिळतील असा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे. अजित सिंग यांच्या लोक दल पक्षाला 7 जागा मिळण्याची शक्यता आहे.