उत्तर भारत गारठला उत्तर प्रदेशात आठ मृत्युमुखी: जनजीवन प्रभावित
By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST
नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीचा प्रकोप कायम आहे़ उत्तराखंडातील उंच भागात सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे शेजारच्या उत्तर प्रदेशात थंडीची प्रचंड लाट असून जनजीवन गारठून गेले आहे़ गत २४ तासांत राज्यात थंडीने आठ जणांचा बळी घेतला आहे़
उत्तर भारत गारठला उत्तर प्रदेशात आठ मृत्युमुखी: जनजीवन प्रभावित
नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीचा प्रकोप कायम आहे़ उत्तराखंडातील उंच भागात सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे शेजारच्या उत्तर प्रदेशात थंडीची प्रचंड लाट असून जनजीवन गारठून गेले आहे़ गत २४ तासांत राज्यात थंडीने आठ जणांचा बळी घेतला आहे़दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आदी राज्यांत थंडीचा कडाका कायम आहे़ गोठवणारी थंडी आणि दाट धुके यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे़ उत्तर प्रदेशात शनिवारी अनेक भागात लोकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला़ जालौन जिल्ह्यातील कदौर भागात दाट धुक्यांमुळे एक ट्रक कालव्यात जाऊन कोसळला़ या अपघातात, सहा जण ठार तर ३४ जण जखमी झालेत़ कुशीनगर जिल्ह्यातही दाट धुक्यांमुळे समोर दिसत नसल्याने अपघात होऊन दोघे ठार झाले़ हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गत २४ तासांत गोरखपूर, वाराणसी, मुरादाबाद, अलाहाबाद आणि लखनौच्या रात्रीच्या तापमानात मोठी घट झाली आहे़ पंजाब आणि हरियाणातही थंडीची लाट कायम आहे़ थंडीमुळे जनजीवन प्रभावित झाले आहे़ दाट धुक्यामुळे दृश्यता कमी झाल्याने चंदीगड विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत़ अनेक रेल्वेगाड्यांचाही खोळंबा झाला आहे़