शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेश : स्कूल बस- ट्रकची धडक, २५ विद्यार्थी ठार

By admin | Updated: January 19, 2017 12:14 IST

दाट धुक्यामुळे स्कूल बस आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात २५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशात घडली.

ऑनलाइन लोकमत
लखनू, दि. १९ - दाट धुक्यामुळे स्कूल बस आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात  २५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. इटा जिल्ह्यातील अलीगंज येथे  आज सकाळ हा अपघात झाला असून सुमारे ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
 
जे. एस. विद्या शाळेची बस ५० विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना हा अपघात झाला. धुक्यामुळे बस चालकाला समोरचा अंदाज आला नाही आणि बस ट्रकवर जाऊन आदळली.  ‘अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे काम प्राधान्याने सुरू आहे. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल केले जात आहे,’ अशी माहिती उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक जावेद अहमद यांनी दिली आहे. 
 
उत्तर प्रदेशमध्ये कडाक्याची थंडी पडली असून अनेक भागात मोठ्या प्रमाणात धुके असल्याने दृष्यमानतेतही घट झाली आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाने सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली होती. मात्र तरीही जे. एस. विद्या शाळा प्रशासनाने शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. जर शाळा बंद ठेवली असती तर आजचा हा अपघात टळला असता व त्या निष्पाप मुलांचे जीव वाचले असते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 
  
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या अपघाताबदद्ल दु:ख व्यक्त केले आहे.