शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात उत्कल एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरुन अपघात; २३ ठार, ४0 जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 06:01 IST

उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात खतौली येथे शनिवारी सायंकाळी पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरून घसरून २३ प्रवासी मृत्युमुखी पडले आणि ४0 हून अधिक जखमी झाले.

मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात खतौली येथे शनिवारी सायंकाळी पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरून घसरून २३ प्रवासी मृत्युमुखी पडले आणि ४0 हून अधिक जखमी झाले. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून, दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले की, सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींना तत्काळ मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या. सुरेश प्रभू यांनी टिष्ट्वट करून, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा घटनास्थळी रवाना झाले असल्याची माहिती दिली. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सदस्य यांना मदत आणि बचावकार्याची देखरेख करण्यास सांगितले आहे. एनडीआरएफच्या तुकड्या गाझियाबादमधून मदतीसाठी रवाना झाल्या आहेत. मेडिकल व्हॅनही येथे पोहोचल्या आहेत. रेल्वे मंत्रालय सातत्याने उत्तर प्रदेश सरकारच्या संपर्कात आहे. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आनंद कुमार यांनी सांगितले की, बचावकार्याला प्राधान्य देत आहोत. अडकून पडलेल्यांना बाहेर काढून त्यांच्यावर उपचार सुरू करणे गरजेचे आहे. घटनास्थळी विजेची व्यवस्था केली आहे. रेल्वे प्रवक्त्याने सांगितले की, घटनास्थळी मदतकार्य वेगाने सुरू आहे. राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी अपघाताबद्दल रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येतील. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे