ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ३० - प्रख्यात सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांची सरोद ब्रिटीश एअरलाईन्सकडून गहाळ झाल्याची संतप्त घटना समोर आली आहे. अमजद अली खान हे लंडनहून दिल्लीत येत असताना सरोद गहाळ झाली असून या सरोदची किंमत सुमारे सहा कोटी रुपये असल्याचे समजते.
सरोदवादक अमजद खाली खान यांच्या ४५ वर्ष जूनी सरोद होती. उस्ताद सोमवारी ब्रिटीश एअरलाईन्सच्या विमानाने दिल्लीत परतत होते. मात्र या प्रवासा दरम्यान त्यांची सरोद गहाळ झाली. ब्रिटीश एअरलाईन्सच्या निष्काळजीपणामुळे सरोद गहाळ झाल्याचे अमजद अली खान यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. दरम्यान, ब्रिटीश एअरलाईन्सने प्रसिद्धीपत्रक काढून या प्रकऱणावर स्पष्टीकरण दिले आहे. प्रवाशांच्या गहाळ झालेल्या बॅग त्यांना परत मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न नेहमीच सुरु असतात असे एअरलाईन्सने म्हटले आहे.