शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात दहशतवादी संघटनांतर्फे लहान मुलांचा हिंसाचारासाठी वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 05:30 IST

काश्मीर खोऱ्यामध्ये सुरक्षा दलांच्या जवानांवर दगडफेक करण्यासाठी जैश-ए-मोहमद व हिज्बुल मुजाहिद्दिन या दहशतवादी संघटनांनी अल्पवयीन मुलांचा वापर केल्याचा ठपका संयुक्त राष्ट्रांनी ठेवला आहे

संयुक्त राष्ट्रे : काश्मीर खोऱ्यामध्ये सुरक्षा दलांच्या जवानांवर दगडफेक करण्यासाठी जैश-ए-मोहमद व हिज्बुल मुजाहिद्दिन या दहशतवादी संघटनांनी अल्पवयीन मुलांचा वापर केल्याचा ठपका संयुक्त राष्ट्रांनी ठेवला आहे. काही राज्यांत नक्षलवादीही अल्पवयीन मुलांचा असा वापर करीत आहेत, असेही संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे.संयुक्त राष्ट्रांच्या अल्पवयीन मुले व हिंसाचार यांच्या संबंधातील वार्षिक अहवालामध्ये पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांना दोषी ठरवले आहे. पाकिस्तानात या संघटनांना आश्रय मिळत असल्याचा उल्लेखही या अहवालात करण्यात आला आहे. अशा दुष्कृत्यांसाठी जगभरातील विविध देशांमध्ये किमान १0 हजार अल्पवयीन मुलांना वापरण्यात येत असल्याचे हा अहवाल सांगतो.एकूण वीस देशांतील अनेक दहशतवादी संघटना हिंसाचारासाठी अल्पवयीन मुलांचा हिंसाचारासाठी वापर करीत असून, त्यात भारत, अफगाणिस्तान, सीरिया, येमेन, फिलिपाइन्स व नायजेरिया यांचा समावेश आहे. भारतीय लष्कर व दहशतवादी संघटना यांच्यातील हिंसक घटनांमध्ये मुलांचा बळी देण्यात येत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.काश्मीरबरोबरच छत्तीसगड व झारखंड या राज्यांमध्येही असेप्रकार घडले आहेत. छत्तीसगड व झारखंड या दोन राज्यांमध्ये नक्षलवादी गट अल्पवयीन मुलांना हिंसाचारात सहभागी करून घेत आहेत, त्यांना शस्त्रे देतआहेत. त्यामुळे नक्षलवादीविरोधी कारवायांमध्ये लहान मुलांचाहीबळी जात आहे, असे हा अहवाल सांगतो. (वृत्तसंस्था)भारतातील सरकारने लहान मुलांवरील अन्याय दूर करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांशी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करतानाच, पाकिस्तानच्या आश्रयावर उभ्या असलेल्या अतिरेकी संघटना व नक्षलवादी गट यांच्यामुळे लहान मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, त्या भागांतील शाळा बंद पडत आहेत, त्यांना आगी लावल्या जात आहेत वा शाळा पूर्णत: पाडल्या जात आहेत, असे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे. भारत सरकारने गुन्हेगारांना शिक्षा करावी, त्यांच्याविरुद्ध मोहीम आखावी, पण अल्पवयीन मुले अशा संघटनांच्या जवळ जाणार नाहीत, यासाठी प्रयत्न करावेत, असेही अहवालाद्वारे सुचविण्यात आले आहे.पाकिस्तानात आत्मघातकी हल्ल्याचे प्रशिक्षणपाकिस्तानातील मदरशांमध्ये शिकणाºया लहान मुलांना आत्मघातकी हल्ल्यांचे प्रशिक्षण दिले जात असल्याचा ठपका ठेवताना, एका व्हिडीओचा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे. मुलींच्या शाळांवर होणाºया हल्ल्यांची दखल घेत, पाकिस्तान सरकारने अशा शाळा व शिकणाºया मुलींना संरक्षण द्यावे, असे अहवालात म्हटले आहे.