शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनांसाठी सौर स्टार्टरचा वापर

By admin | Updated: July 12, 2015 23:56 IST

जिल्हा परिषद : घरबसल्या जलकुंभाची माहिती नागपूर : ग्रामीण भागातील लोक ांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी सौरऊर्जा स्टार्टरचा वापर केला जाणार आहे. मौदा तालुक्यातील चिरवा गावात याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू केला आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजनासाठी याचा वापर करण्याचा प्रस्ताव ...


जिल्हा परिषद : घरबसल्या जलकुंभाची माहिती
नागपूर : ग्रामीण भागातील लोक ांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी सौरऊर्जा स्टार्टरचा वापर केला जाणार आहे. मौदा तालुक्यातील चिरवा गावात याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू केला आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजनासाठी याचा वापर करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या विचाराधीन आहे.
या स्टार्टरच्या माध्यमातून जलकुंभातील पाण्याची पातळी, पुरवठा करण्यात आलेले पाणी याची माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच जलकुंभात पाणी नसल्यास घरुनच मोटारपंप सुरू करता येईल. यामुळे गावापासून दूर व जंगल भागातील जलस्रोत असलेल्या योजनासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल, असा विश्वास अध्यक्ष निशा सावरकर यांनी व्यक्त केला.
ग्रामीण भागातील वीज भारनियमनाचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. परंतु सौरऊर्जेवरील स्टार्टरमुळे वीज प्रवाह सुरू होताच मोटारपंप सुरू करता येईल. यासाठी आर्थिक तरतूद करून जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.
दरम्यान पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे उद्भवणाऱ्या साथ रोगाला आळा घालण्यासाठी मेडीक्लोर औषधाचा घरोघरी पुरवठा करण्यात यावा. ग्रामीण भागात जनजागृती करण्याच्या सूचना आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. पारशिवनी येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मागील काही वर्षापासून प्रलंबित आहे. लोकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्याचे निर्देश समितीच्या बैठकीत देण्यात आले.
जलयुक्त शिवर योजना प्रभावीपणे राबविली जावी, यात लोकसहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जि.प.च्या सिंचन विभागाला करण्यात आल्याची माहिती सावरकर यांनी दिली. (प्रतिनिधी)