शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

बाटलीबंद पाण्याचा वापर वाढला टंचाई वाढली : कुलिंगच्या नावाखाली ग्राहकांची लूट

By admin | Updated: May 11, 2015 00:32 IST

औसा : शहरासह तालुक्यात यंदा ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण केलेले बोअरही कोरडे पडू लागले आहेत़ पाण्यावर लाखो रूपये खर्च करूनही प्रतीक्षा करावी लागत आहे़ शहरासह ग्रामीण भागात सध्या बाटलीबंद पाण्याचा वापर वाढला आहे तर कुलिंगच्या नावाखाली ग्राहकांची लूट केली जात आहे़

औसा : शहरासह तालुक्यात यंदा ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण केलेले बोअरही कोरडे पडू लागले आहेत़ पाण्यावर लाखो रूपये खर्च करूनही प्रतीक्षा करावी लागत आहे़ शहरासह ग्रामीण भागात सध्या बाटलीबंद पाण्याचा वापर वाढला आहे तर कुलिंगच्या नावाखाली ग्राहकांची लूट केली जात आहे़तालुक्यात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ ४४ गावांना ८१ अधिग्रहणांद्वारे पाणीपुरवठा होत आहे़ २ टँकर सुरु असूनही आणखीन १२ टँकरची मागणी करण्यात येत आहे़ अधिग्रहण करण्यात आलेले बोेअर बंद पडत आहेत़ तापमानाने चाळीशी ओलांडल्याने प्रत्येकाच्या घशाला कोरड पडत आहे़ त्यामुळे प्रत्येक जण थंड पाणी मिळावे म्हणून प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहेत़ प्रवास करताना प्रत्येक जण रस्त्याच्या बाजूला असलेल्या हॉटेलमधून बाटलीबंद पाण्याची बॉटल विकत घेतात़ दहा रूपयांची बाटली पंधरा ते वीस रूपयांना विकली जात आहे़ कोणी तक्रार केलीच तर परवडली तर घ्या़़़असा प्रश्न केला जातो़ आता ग्रामीण भागातही पंधरा ते वीस लिटरचे जार मागविले जात आहेत़ शहरी भागातील व्यापारी प्रतिष्ठानांमध्येही आता पिण्याचे पाणी जारमधील मागविले जात आहेत़चौकट़़़एका व्यापार्‍याने सांगितले की, फोन केल्यानंतर आठ ते दहा तास पाणी मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते़ एकुणच येणारा महिना तालुकावासियांसाठी कसा जाईल याचीच चिंता आता सतावत आहे़ ग्रामीण भागात आठ ते दहा तास वीजपुरवठा उपलब्ध असतो़ त्यामध्येच थंड झालेले पाणी विकावे लागते़ फ्रिज, वीज याचा विचार केला तर १५ ते २० रूपयाला पाणी विकावे लागत असल्याचे सांगण्यात आले़ शहरी भागातही हीच अवस्था आहे़ एका पाणी विक्री करणार्‍या कर्मचार्‍याने सांगितले की मागणी पूर्ण करताना काट्यावरची कसरत करावी लागते़