शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत इव्हीएम ऐवजी मतपत्रिका वापरा

By admin | Updated: March 14, 2017 17:51 IST

दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत इव्हीएम ऐवजी मतपत्रिका वापरा, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सरकारच्या मुख्य सचिवांना दिले आदेश

सुरेश भटेवरा / ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 14 - दिल्ली महापालिकेच्या निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (इव्हीएम) ऐवजी छापील मतपत्रिकेव्दारा आयोजित करा, त्यासाठी जी काही कायदेशीर औपचारिकता आवश्यक आहे, ती मंगळवार सायंकाळपर्यंत पूर्ण करा, असे आदेश मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सरकारच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था आणि पाच राज्यात नुक त्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत, भाजपला अनपेक्षित यश मिळाल्यामुळे इव्हीएम मशिन्स हॅक झाल्याचा आरोप विविध पक्षांनी केला. संगणक प्रणाली ही सुरक्षित नसून त्यात कोणतीही गोष्ट हॅक होऊ शकते. तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत अमेरिकेत व्हाईट हाऊ स देखील हॅकिंगपासून सुरक्षित राहू शकलेले नाही. वारंवार ही बाब सिध्द झाल्यामुळे मायावतींनी आरोप करताच अन्य पक्षांनी देखील त्यांना दुजोरा देत या मतदान पध्दतीवर आक्षेप नोंदवला. आयोगाने हे आरोप फेटाळले असले तरी गोवा आणि पंजाबमधे अपेक्षित यश न मिळाल्यामुळे आम आदमी पक्षानेही इव्हीएम मतदानावर शंका व्यक्त केली आहे. केजरीवाल यांनी तमाम राजकीय पक्षांच्या शंकांची दखल घेत उपरोक्त आदेश मुख्य सचिवांना दिला आहे. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत छापील मतपत्रिकांचा वापर व्हावा अशी मागणी केली. दिल्ली सरकारतर्फेच दिल्ली महापालिकेच्या निवडणुका आयोजित केल्या जातात तथापि दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांची मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर नेमकी काय भूमिका आहे, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘आप’ चे प्रवक्ते संजयसिंग म्हणाले, पंजाबच्या निवडणुका जिंकणारा काँग्रेस पक्षही इव्हीएम मतदानाबाबत साशंक आहे. राजदचे लालूप्रसाद यांनीही जाहीरपणे इव्हीएम मतदान हॅक झाल्याची शंका व्यक्त केली आहे.भाजप जोपर्यंत विरोधी पक्षात होता भाजपचे नेते देखील पोटतिडकीने इव्हीएमच्या मतदानाबाबत शंका उपस्थित करायचे. उत्तरप्रदेशात अजूनही नगरपालिका व पंचायतीच्या निवडणुका मतपत्रिकेव्दाराच घेतल्या जातात. देशातल्या प्रमुख राजकीय पक्षांना जर तंत्रज्ञान आधारीत मतदानाबद्दल शंका असेल तर मतपत्रिकेव्दारे निवडणूक घेण्यास काय हरकत आहे? असे संजय सिंग म्हणाले.