बंगळुरू : इंडियन न्यूजपेपर्स सोसायटीच्या अध्यक्षपदी अकिला उरणकर (बिझनेस इंडिया) यांची निवड झाली असून, सोमेश शर्मा यांच्याकडून त्या सूत्रे स्वीकारतील. जयंत माम्मन मॅथ्यू यांची डेप्युटी प्रेसिडेंट, शैलेश गुप्ता यांची व्हाइस प्रेसिडेंट व शरद सक्सेना यांची कोषाध्यक्षपदी निवड झाली. एस.पी. गौर हे महासचिव असतील.कार्यकारी परिषदेवर एल. आदिमूलन, आशिश बग्गा, एस. बालसुब्रमण्यम आदित्य, गिरीश आगरवाल, समहित बाल, व्ही. के. चोप्रा व विजय कुमार चोप्रा यांची निवड झाली आहे. अन्य समिती सदस्यांमध्ये ‘लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेड’चे चेअरमन विजय दर्डा यांच्यासह विवेक गोएंका, जगजीत सिंग दर्डी, महेंद्र मोहन गुप्ता, प्रदीप गुप्ता, संजय गुप्ता, मोहित जैन, सरविंदर कौर यांचा समावेश आहे.याशिवाय सी. एच. किरण, आर. लक्ष्मीपती, राहुल महेश्वरी, विलास मराठे, प्रदीप पवार, डी. डी. पूरकायस्थ, आर. एम. आर. रमेश, के. राजा प्रसाद रेड्डी, अतिदेव सरकार, राकेश शर्मा, एम. व्ही. श्रेयांसकुमार, किरण ठाकूर, बिजू वर्गीस, राजीव वर्मा, विनय वर्मा, जेकब मॅथ्यू, बाहुबली शाह, होरमसजी कामा, कुंदन व्यास, के. एम. तिलक कुमार, रवींद्र कुमार किरण वडोदरिया, पी. व्ही. चंद्रन आणि सोमेश शर्मा हेही समिती सदस्य आहेत.
आयएनएसच्या अध्यक्षपदी उरणकर , समिती सदस्यांमध्ये लोकमत मीडियाचे विजय दर्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 01:22 IST