शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उपसरपंच, सदस्यांनीच ठोकले ग्रामपंचायतला कुलूप ममुराबाद येथील प्रकार : चौदाव्या वित्त आयोगाच्या रकमेत गैरव्यवहार केल्याचा आरोप

By admin | Updated: August 1, 2016 23:56 IST

जळगाव : चौदाव्या वित्त आयोगाच्या रकमेतून गावात काम न करता त्यात गैरव्यवहार होऊन या रकमेचा हिशेब मिळत नसल्याने सोमवारी सकाळी ममुराबाद येथे उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनीच ग्रामपंचायतला कुलूप ठोकले. दरम्यान, या रकमेतून गावात काम केल्याचा दावा ग्रामसेवकांनी केला आहे.

जळगाव : चौदाव्या वित्त आयोगाच्या रकमेतून गावात काम न करता त्यात गैरव्यवहार होऊन या रकमेचा हिशेब मिळत नसल्याने सोमवारी सकाळी ममुराबाद येथे उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनीच ग्रामपंचायतला कुलूप ठोकले. दरम्यान, या रकमेतून गावात काम केल्याचा दावा ग्रामसेवकांनी केला आहे.
१८ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा हिशेब लागेना....
गावातील विविध कामांसाठी चौदाव्या वित्त आयोगातून ममुराबाद ग्रामपंचायतला १ फेब्रुवारी ते ९ जून २०१६ दरम्यान चार टप्प्यांमध्ये २० लाख १२ हजार ७३५ रुपयांचा निधी मिळाला. यामध्ये ग्रामपंचायतने १ मार्च ते २९ जून २०१६ दरम्यान जेसीबीद्वारे काम करण्यासह पाईप व इतर खरेदीमध्ये १८ लाख ६२ हजार ५०० रुपये खर्च केल्याचे दाखविण्यात आले आहे.

गावात कामच झाले नाही...
एवढी मोठी रक्कम खर्च तर केली मात्र त्यातून गावात एकही काम झालेले दिसत नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
अखेर कुलूप ठोकले....
या रकमेचा हिशेब लागत नसल्याने उपसरपंच प्रमोद शिंदे, सदस्य शरद पाटील, विलास सोनवणे, लोटन पाटील, युवराज पाटील, सरपंच महिलेचे पती हेमंत चौधरी यांच्यासह पीक संरक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब पाटील, महेंद्र सोनवणे, मनोज पाटील, आत्माराम सोनवणे यांच्यासह दीडशेच्यावर ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालय गाठून ग्रामसेवक पी.बी. अहिरे यांना या खर्च झालेल्या रकमेचा हिशेब विचारला. मात्र नंतर या, लेखी द्या अशी उडवाउडवीचे उत्तरे अहिरे यांनी दिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला कुलूप लावण्याचा निर्णय घेतला. मात्र ग्रामसेवक बाहेर निघत नव्हते. त्यावेळी काही सदस्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी ते बाहेर आले व उपसरपंच प्रमोद शिंदे यांनी ग्रामपंचायतला कुलूप ठोकले.

दोन ते तीन सदस्य करतात व्यवहार...
ग्रामपंचायतला मिळणार्‍या निधीतून कोणतेही काम करताना दोन ते तीन सदस्यच व्यवहार करतात. त्यामुळे इतरांना त्याची माहिती नसते. त्यामुळे गैर व्यवहार होत असल्याचे सदस्यांसह ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

पासबुक, चेकबुक घेतले ताब्यात....
ग्रामसेवकांनी उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने या रकमेबाबत माहिती नाही तर मग व्यवहार कोण करते असा जाब विचारत ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवक अहिरे यांच्याकडून ग्रामपंचायतच्या सर्व बँकांचे पासबुक, चेकबुक ताब्यात घेतले.