शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी रूग्णालयांमध्ये अप्रशिक्षीत स्टाफ

By admin | Updated: July 20, 2016 23:49 IST

भाजपाचे नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी शहरातील खाजगी नोंदणीकृत नर्सिंग होम (दवाखाने) किती व त्यातील नोंदणीकृत (प्रशिक्षीत) स्टाफ किती? अशी विचारणा केली. त्यावर प्रशासनाकडून ३३९ खाजगी नोंदणीकृत नर्सिंग होम्स असून स्टाफबाबत तपासणी गेल्या वर्षभरात आरोग्याधिकारीपदी तज्ज्ञ अधिकारी नसल्याने तपासणी झाली नसल्याचे सांगण्यात आले. आरोग्याधिकारी डॉ.विकास पाटील यांनी दहा महिने आपण नसल्याने तपासणी केलेली नसल्याचे सांगितले. त्यावर रमेशदादांनी मनपाच्या अखत्यारितील हा विषय नसल्याचे सांगितले. अखेर महापौरांनी आरोग्याधिकार्‍यांना याबाबतचे अधिकार आहेत का? याची माहिती घेऊन अधिकार असल्यास सर्व दवाखान्यांची तपासणी करून अहवाल पुढील महासभेत सादर करण्याचे आदेश दिले.

भाजपाचे नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी शहरातील खाजगी नोंदणीकृत नर्सिंग होम (दवाखाने) किती व त्यातील नोंदणीकृत (प्रशिक्षीत) स्टाफ किती? अशी विचारणा केली. त्यावर प्रशासनाकडून ३३९ खाजगी नोंदणीकृत नर्सिंग होम्स असून स्टाफबाबत तपासणी गेल्या वर्षभरात आरोग्याधिकारीपदी तज्ज्ञ अधिकारी नसल्याने तपासणी झाली नसल्याचे सांगण्यात आले. आरोग्याधिकारी डॉ.विकास पाटील यांनी दहा महिने आपण नसल्याने तपासणी केलेली नसल्याचे सांगितले. त्यावर रमेशदादांनी मनपाच्या अखत्यारितील हा विषय नसल्याचे सांगितले. अखेर महापौरांनी आरोग्याधिकार्‍यांना याबाबतचे अधिकार आहेत का? याची माहिती घेऊन अधिकार असल्यास सर्व दवाखान्यांची तपासणी करून अहवाल पुढील महासभेत सादर करण्याचे आदेश दिले.
गिरणा व दापोरा पंपींगबाबत होणार निर्णय
भाजपाच्या उज्ज्वला बेंडाळे यांनी गिरणा पंपींग, दापोरा पंपीग, सावखेडा जलशुद्धीकरण केंद्र या योजना बंद आहेत. तेथील स्थावर मिळकत व मशिनरी तेथे असलेले कर्मचारी याबाबत काय कार्यवाही केली? अशी विचारणा केली. त्यावर ही मशिनरी पडून असल्याचे तसेच देखरेखीसाठी काही कर्मचारी नियुक्त असल्याचे सांगण्यात आले. त्यावर महापौरांनी याबाबत मजिप्राशी चर्चा करून पुढील महासभेत मशिनरीबाबत व तेथील जागांबाबतचा प्रस्ताव सादर करावा. जेणेकरून त्याबाबत धोरणात्मक निर्णय घेता येईल, असे स्पष्ट केले.
विद्यार्थी वाहतुकीबाबत शाळांना देणार पत्र
मनसेचे अनंत जोशी यांनी शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ने-आण करणार्‍या रिक्षा, वाहने हे रस्त्ययावरच उभी केली जातात. तेथूनच विद्यार्थी शाळेत ये-जा करतात. त्यामुळे एखादवेळी गंभीर अपघात होण्याची भिती आहे. त्यामुळे या शाळांनी त्यांच्या आवारात ही वाहने उभी राहण्याची व्यवस्था करण्याबाबत पत्र देण्याची मागणी केली. त्यानुसार महापौरांनी कार्यवाहीचे आदेश संबंधीतांना दिले.