शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

झारखंड भाजपामध्ये अस्वस्थता

By admin | Updated: July 5, 2016 04:24 IST

झारखंड प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष ताला मरांडी यांच्या मुलाने अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे भाजपामध्ये प्रचंड अस्वस्थता असून, त्यांनी अध्यक्षपदाचा

- एस. पी. सिन्हा, रांची

झारखंड प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष ताला मरांडी यांच्या मुलाने अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे भाजपामध्ये प्रचंड अस्वस्थता असून, त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, असे पक्षाचे नेतेच खासगीत बोलत आहेत. अल्पवयीन मुलीशी विवाह करणारा मुन्नाअटक टाळण्यासाठी पळून गेला असून, पोलीस त्याचा शोधत आहेत.दुसरीकडे ती मुलगी अल्पवयीन नाही, असा दावा ताला मरांडी आणि खासदार निशिकांत दुबे यांनी केला असून, त्या मुलीची वैद्यकीय तपासणी केली जावी, अशी मागणी दोघांनी केली आहे. आपण आदिवासी समाजातील, आमच्या रीतीरिवाजानुसारच हा विवाह झाला असल्याचे ताला मरांडी यांनी सांगितले. ताला मरांडी यांना भाजपाने प्रदेशाध्यक्ष केल्यामुळे आमची ताकद वाढली आहे. त्यामुळे घाबरलेल्या झारखंड मुक्ती मोर्च्याच्या नेत्यांनी कुभांड रचले आहे, असा आरोप खा. दुबे यांनी केला आहे. मात्र खा. दुबे यांच्याखेरीज भाजपाचा एकही नेता मरांडी यांच्या बाजूने बोलण्यास तयार नाही. किंबहुना त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, असेच मत भाजपा नेते खासगीत व्यक्त करीत आहेत. आमची फजिती झालीपक्षाध्यक्ष अमित शहा यांनी या प्रकरणाची सर्व माहिती मागवून घेतली आहे. आमची या प्रकरणात फजिती झाली आहे, हे उघड आहे आणि विरोधी पक्ष ज्या पद्धतीने भाजपावर हल्ले चढवत आहे, आक्रमक होत आहे, ते पाहता लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे, असे एका नेत्याने बोलून दाखवले.