शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींच्या राजीनाम्यावरून अभूतपूर्व गदारोळ

By admin | Updated: May 11, 2015 23:46 IST

केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अडून बसलेल्या काँग्रेसने सोमवारी राज्यसभेचे कामकाज बंद पाडले

नवी दिल्ली : केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अडून बसलेल्या काँग्रेसने सोमवारी राज्यसभेचे कामकाज बंद पाडले. ४ वाजेपर्यंत या सभागृहाचे कामकाज तब्बल आठ वेळा तहकूब करण्यात आले, हे विशेष.गडकरी यांच्या पूर्ती समूहाला कर्ज देताना अनियमितता घडवून आणल्याचा ठपका नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाच्या (कॅग) अहवालात ठेवण्यात आल्याचा मुद्दा काँग्रेसने जोरदारपणे लावून धरला. दरम्यान, गडकरी यांनी कॅगच्या अहवालावर मौन तोडत आरोप फेटाळले आहेत. कॅगच्या अहवालात माझ्या नावाचा कुठेही उल्लेख नसताना हेतुपुरस्सर राजकीय कारणांवरून वाद निर्माण करण्यात आला आहे, असे ते म्हणाले. राज्यसभेत लागोपाठ दुसऱ्या दिवशी सोमवारी कॅगच्या अहवालावर विरोधकांनी गडकरींच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्यामुळे वारंवार कामकाजाचा खोळंबा झाला. शून्य तास आणि प्रश्नोत्तराचा तासही वाया गेला. भोजन अवकाशापूर्वी सभागृहाचे कामकाज पाच वेळा रोखण्याचा विक्रम घडला. ३ वाजेपर्यंत सात वेळा कामकाज तहकूब करण्यात आल्यानंतर आठव्यांदा कामकाज सुरू झाले, त्यावेळीही काँग्रेसचे सदस्य आक्रमक बनले होते. त्यांनी हौदात धाव घेत नारेबाजी चालूच ठेवली. काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी कॅगचा अहवाल हाती फडकवत लक्ष वेधले. बसपाचे नरेश अग्रवाल यांनी मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, मात्र गदारोळात ते शक्य झाले नाही. गडकरी यांनी निवेदनात आरोप फेटाळून लावले. मात्र समाधान न झालेल्या काँग्रेसच्या सदस्यांनी गदारोळ सुरूच ठेवल्याने अखेर संध्याकाळी ४ वाजता कामकाज पूर्णपणे थांबविण्यात आले. सकाळी काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी कॅगच्या अहवालाचा मुद्दा उपस्थित केला. पूर्ती या गडकरींच्या कंपनीत अनियमितता असल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. कोणताही भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केल्याचे पाहता गडकरींनी राजीनामा द्यावा. त्यावर संसदीय कार्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी गडकरींवरील आरोप खोटे असल्याचे स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)