शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

पाकमधील अज्ञाताने फोनवरून मोदींना ठार मारण्यासाठी दिली 50 कोटींची ऑफर

By admin | Updated: May 22, 2017 13:39 IST

मध्य प्रदेशमधल्या सतना जिल्ह्यातील कुशल सोनी नावाच्या व्यक्तीला पाकिस्तानातून एका अज्ञात व्यक्ती फोन केला.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - गेल्या काही दिवसांपासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद्यांच्या रडारवर आहेत. मध्य प्रदेशमधल्या सतना जिल्ह्यातील कुशल सोनी नावाच्या व्यक्तीला पाकिस्तानातून एका अज्ञात व्यक्ती फोन केला. 25 मे रोजी मुंबईत होणा-या रॅलीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना बॉम्बस्फोट घडवून उडवून देण्यासाठी 50 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे, अशी माहिती अज्ञात फोनकर्त्यानं दिली असून, तो पाकिस्तानातून बोलत असल्याचं सांगितलं आहे. +79651219 या नंबरवरून त्या अज्ञात पाकिस्तानी व्यक्तीनं फोन केला होता.  
 कुशल सोनी या व्यक्तीनं पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हाही दाखल केला असून, पोलीस त्या फोन कॉलचा अधिक तपास करत आहेत. सध्या तरी पोलिसांचा सायबर सेलच्या माध्यमातून तपास सुरू आहे. तत्पूर्वी मध्य प्रदेशमधल्या इंटेलिजन्सनं उत्तर प्रदेश पोलिसांना अलर्ट केलं होतं की, दहशतवादी भगवा वेष परिधान करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. सतना पोलीस अधीक्षक मिथिलेश शुक्ला यांच्या मते, पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. सायबर सेल याचा तपास करत आहेत. सतनामधल्या रामनगरमधले रहिवासी कुशल सोनी यांना शनिवारी संध्याकाळी 4 वाजून 50 मिनिटांनी सतनाच्या रामनगरमधल्या कुशल सोनी यांना एक कॉल आला. फोन करणा-या व्यक्तीनं 25 मे रोजी मुंबईत होणा-या रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना बॉम्बस्फोट घडवून उडवून द्यायचं आहे. बॉम्बस्फोट घडवण्यासाठी दोन लोक तयार आहेत. तुम्हीही या कटात सामील व्हा, असं कुशल सोनी यांना सांगण्यात आलं आहे. यासाठी तुम्हाला पाहिजे तेवढी रक्कम देण्यात येईल. मात्र त्यानं स्वतःचं नाव नाही सांगितलं.  कुशल सोनीला पहिल्यांदा वाटतं कोणीतरी त्याची चेष्टा करत आहे. मात्र मोबाईल नंबर पाहिल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच हलली. त्यानंतर सोनी यांनी याची तक्रार रामनगर पोलिसांत केली आणि बोलण्याचं रेकॉर्डिंग पोलिसांना सुपूर्द केलं. रामनगर पोलीस ठाण्याचे प्रमुख मिश्रा म्हणाले, हा फोन परदेशातून आला होता. फोन करणा-याची भाषा गुजराती वाटत होती. गेल्या काही दिवसांपूर्वीच सतनाच्या बलराम आणि राजीव नावाच्या दोन पाकिस्तानी गोपाळ एसटीएफनं अटक केली आहे.