हैदराबाद : रोहित वेमुला आत्महत्याप्रकरणी आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यास विद्यापीठ प्रशासन तयार आहे. प्रसार माध्यमांच्या उपस्थितीत ही चर्चा करण्यासही विद्यापीठ राजी आहे, असे हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू विपीन श्रीवास्तव सोमवारी म्हणाले. आंदोलक विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण मागे घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, वेमुला याच्यासह निलंबित करण्यात आलेल्या चारही दलित विद्यार्थ्यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
विद्यापीठाची चर्चेची तयारी
By admin | Updated: January 26, 2016 02:20 IST