शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

दादरीतील घटनेत संयुक्त राष्ट्राने लक्ष घालावे - आझम खान

By admin | Updated: October 5, 2015 15:30 IST

दादरी येथे गोमांस खाल्ल्याच्या संशयावरुन झालेल्या हत्येमागे भाजपाचाच हात असल्या आरोप समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत

लखनौ, दि. ५ - दादरी येथे गोमांस खाल्ल्याच्या संशयावरुन झालेल्या हत्येमागे भाजपाचाच हात असल्या आरोप समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केला आहे. या घटनेसंदर्भात आझम खान यांनी थेट संयुक्त राष्ट्रालाच पत्र लिहून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. 

दादरीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी आझम खान यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आझम खान म्हणाले, दादरीतील घटनेप्रकरणी मी संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांना पत्र पाठवले आहे. भारतातील मुसलमानांच्या सद्यस्थितीची माहितीही मी त्यांना दिला असून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंतीही मून यांना केली आहे. पंतप्रधान आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थानिक प्रश्न मांडतात, देशातील जातीय दंगलींच्या वाढत्या प्रमाणाचा प्रश्न त्यांनी संयुक्त राष्ट्रात मांडावा असा टोलाही खान यांनी लगावला आहे. मोदींनी जातीय व्देषाचे विष पसरवणा-यांना नियंत्रणात आणले पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. आता बिहार निवडणुकीचा अजेंडा बदलला आहे, विकासावर कोणीही बोलत नाही, गोहत्या केल्याबद्दल आता कोणीही उठून एखाद्याची हत्या करतो असे त्यांनी नमूद केले. गोमांस देणा-या पंचतारांकित हॉटेल्सना केंद्र सरकारने परवाने दिले, मग त्यांचे परवाने का रद्द करत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला.