शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये अनोखा धार्मिक सद्भाव

By admin | Updated: August 28, 2014 02:27 IST

बिहारमध्ये धार्मिक सद्भावनेचा अनोखा वस्तूपाठ घालून देत पुरोहिताने हज यात्रेकरूंना आश्रमात राहण्याचा तर मौलानांनी पिंडदानासाठी येणाऱ्यांना मदरशांची दारे खुली करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

गया : बिहारमध्ये धार्मिक सद्भावनेचा अनोखा वस्तूपाठ घालून देत पुरोहिताने हज यात्रेकरूंना आश्रमात राहण्याचा तर मौलानांनी पिंडदानासाठी येणाऱ्यांना मदरशांची दारे खुली करण्याचा प्रस्ताव दिला आहे.जगप्रसिद्ध विष्णुपद मंदिराचे ख्यातनाम पुरोहित स्वामी राघवाचार्य यांनी राज्यातील हज यात्रेकरूंना आपल्या आश्रमात नि:शुल्क आदरातिथ्य देऊ केले आहे. त्याला तेवढ्याच उत्साहाने प्रतिसाद देत जिल्ह्यातील मदरशा असोसिएशनचे प्रमुख मौलाना उमर नुरानी यांनी पिंडदान आणि पित्रदोष निवारण विधीसाठी गया येथे येणाऱ्यांना मदरशाची दारे खुली करण्याचे जाहीर केले. गया प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी एक विशेष बैठक आयोजित केली होती, त्यावेळी पुरोहित व मौलानांनी हे प्रस्ताव ठेवले.स्वामींनी हज यात्रेकरूंना केवळ रात्री मुक्कामाचा प्रस्ताव दिला नाही तर त्यांच्यासाठी आश्रमातील स्वयंपाक खोली खुली केली. ज्यांना आश्रमात शिजलेले अन्न नको असेल, त्यांना अन्नधान्य, गॅस, स्टोव्ह आणि सिलिंडर देण्यात येईल, असेही राघवाचार्य म्हणाले. बिहारमधील ही घडामोड राष्ट्रीय एकात्मता दर्शविणारी असून अनेक स्तरातून या भूमिकेचे स्वागत करण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)