शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

केंद्रीय मंत्रिमंडळ, भाजपात फेरबदलाचे वारे

By admin | Updated: December 31, 2015 00:20 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करू इच्छितात. भाजपाच्या पक्ष संघटनेचा चेहरामोहरा बदलण्याचाही त्यांचा इरादा आहे. तथापि, आपल्या विकास अजेंड्याला अनुरूप

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करू इच्छितात. भाजपाच्या पक्ष संघटनेचा चेहरामोहरा बदलण्याचाही त्यांचा इरादा आहे. तथापि, आपल्या विकास अजेंड्याला अनुरूप कामगिरी आश्वासकपणे बजावू शकतील, असे नवे चेहरे शोधणे अद्याप शक्य झालेले नाही, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. बिहार निवडणुकीतील दारुण पराभवानंतरच या प्रक्रियेला त्यांनी प्रारंभ केला असून, मकर संक्रांतीनंतर सरकार व संघटनेत काही खास फेरबदल घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.देशातील बेरोजगारी दूर करण्याचे व विकासाच्या नव्या योजना कार्यान्वित करण्याचे आश्वासन देत, मोदी सरकार केंद्रात सत्तेवर आले. येत्या मे महिन्यात सरकारची दोन वर्षे पूर्ण होतील. तथापि, जनतेला अप्रूप वाटावे, अशी भव्य कामगिरी सरकारला अद्यापपावेतो काही करून दाखवता आलेली नाही. काही आक्रमक कट्टरपंथियांमुळे पक्ष संघटनेलाही विरोधकांचे हल्ले सहन करावे लागले. या पार्श्वभूमीवर सरकार व संघटनेची प्रतिमा लवकरात लवकर सुधारावी, असा संकल्प मोदींच्या मनात आहे. भाजपा अध्यक्षपदाची अमित शाह यांची मुदतही जानेवारी महिन्यात संपत आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर त्यांची पुन्हा निवड होते की नाही, याविषयीदेखील तर्कवितर्क केले जात आहेत. या दोन्हींतून येत्या मकर संक्रांतीनंतर मार्ग निघू शकतो, अशी सूत्रांची अपेक्षा आहे.मोदी मंत्रिमंडळात सध्या ६६ मंत्री आहेत. त्यात उत्तरप्रदेशातील १३, बिहारचे ८ व महाराष्ट्रातले ७ मंत्री आहेत. मंत्रिमंडळात वकील, डॉक्टर, इंजिनीअर, चार्टर्ड अकाउंटंट, अर्थतज्ज्ञ असे ३४ जण आहेत. मंत्रिमंडळात ८ महिलांचाही समावेश आहे. मे २0१४ मध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. त्यानंतर, नोव्हेंबर २0१४ मध्ये शिवसेनेतून भाजपमध्ये दाखल झालेले सुरेश प्रभू व गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचा समावेश करून, मोदींनी त्यांच्याकडे अनुक्रमे रेल्वे व संरक्षण खात्याची जबाबदारी सोपवली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नव्या फेरबदलात मोदी अरुण जेटलींकडे पुन्हा संरक्षण खाते सोपवू इच्छितात. मात्र, अर्थ खात्यासाठी सुयोग्य व्यक्तीचा शोध अजून संपलेला नाही. वादग्रस्त विधाने करून, सरकारला अडचणीत आणणाऱ्या गिरीराजसिंग व निरंजन ज्योतींची मंत्रिमंडळातून गच्छंती होऊ शकते.२0१६ साली देशातल्या पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यात आसाम वगळता अन्य राज्यात भाजपला फारसे भवितव्य नाही. २0१७ साली उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब आदी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर भाजपचे सारे लक्ष सध्या केंद्रित आहे. त्यापूर्वी पक्षाची व केंद्र्र सरकारची इमेज बदलण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न आहे. जानेवारी महिन्यात भाजप व संघपरिवाराची या संदर्भात चर्चा होऊ शकते. मकर संक्रांतीनंतर मंत्रिमंडळात व संघटनेत काही महत्त्वाचे फेरबदल होऊ शकतील, अशी शक्यता आहे.