शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाने सायकलस्वार युवकास उडवले

By admin | Updated: April 24, 2016 19:01 IST

जळगाव : अज्ञात वाहनाने एका सायकलस्वार युवकास उडवल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास चित्रा चौकात घडली. युवकाची ओळख अस्पष्ट असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

जळगाव : अज्ञात वाहनाने एका सायकलस्वार युवकास उडवल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास चित्रा चौकात घडली. युवकाची ओळख अस्पष्ट असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार, चित्रा चौकातील नवरंग चहा दुकानाजवळ एका १५ वर्षीय सायकलस्वार युवकास अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यानंतर धडक देणारा वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी अवस्थेत सायकलस्वार युवक रस्त्यावर पडलेला होता. ही घटना समोर आल्यानंतर परिसरातील वसीम बागवान, इसाक बागवान, मोहसीन बागवान, नीलेश पवार, संजय परदेशी या तरुणांनी जखमी युवकास तत्काळ रिक्षाद्वारे उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यास अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. त्याठिकाणी डॉ.समीर चौधरी, डॉ.सचिन अहिरे यांनी त्याच्यावर उपचार केले.
श्वसननलिकेला दुखापत
अपघातात युवकाच्या श्वसननलिकेला गंभीर दुखापत झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तातडीने त्याच्या घशात नळी टाकून त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला. युवकाच्या अंगात लाल रंगाची शाळेची पॅँट आहे. तो शिवाजीनगर किंवा गेंदालाल मिल भागातील रहिवासी असावा, असा अंदाज आहे. युवकास दुचाकीने उडवल्याची चर्चा घटनास्थळी होती. मात्र, त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.