शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांची फसवणूक प्रकरण

By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST

विमानतळ महिला अधिकाऱ्यासहतिघांचा जामीन अर्ज फेटाळलाबेरोजगारांची ४४ लाखांनी लुबाडणूकनागपूर : नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची ४४ लाख ५० हजार रुपयांनी लुबाडणूक केल्या प्रकरणी शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश वसंत कुळकर्णी यांच्या न्यायालयाने विमानतळ महिला अधिकारी, दोन शिक्षक, अशा तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. माधुरी शिवराजसिंग वाघमारे रा. कमलदत्त अपार्टमेंट धंतोली, ...


विमानतळ महिला अधिकाऱ्यासह
तिघांचा जामीन अर्ज फेटाळला

बेरोजगारांची ४४ लाखांनी लुबाडणूक

नागपूर : नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची ४४ लाख ५० हजार रुपयांनी लुबाडणूक केल्या प्रकरणी शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश वसंत कुळकर्णी यांच्या न्यायालयाने विमानतळ महिला अधिकारी, दोन शिक्षक, अशा तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
माधुरी शिवराजसिंग वाघमारे रा. कमलदत्त अपार्टमेंट धंतोली, रमेश जोंधरू बावणे रा. सुदर्शननगर न्यू नरसाळा रोड आणि रवींद्र उदयभान कठाणे रा. नंदनवन झोपडपट्टी, अशी आरोपीची नावे आहेत. त्यापैकी माधुरी ही नागपूर विमानतळ येथे वरिष्ठ अधिक्षिका तर अन्य दोघे शिक्षक आहेत. यापूर्वी माधुरीचा मुलगा हर्षल याला याच गुन्ह्यात अटक झालेली आहे.
स्वागतनगर येथे राहणारे मोरेश्वर वाटकर यांच्या तक्रारीवरून या आरोपींविरुद्ध धंतोली पोलिसांनी भादंविच्या ४२०, ४६८, ४७१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
या आरोपींनी ३१ डिसेंबर २०१३ पासून नोकरी लावून देण्याच्या गोरखधंद्याला सुरुवात केली होती. त्यांनी वाटकर यांचा साळा रुपेश चावके याला वेकोलि येथे लिपीक म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून ८ लाख रुपये घेतले होते. हेच आमिष दाखवीत संदीप शाहू याच्याकडून १ लाख, कळमेश्वर येथील कुलदीप चाफले याच्याकडून ८ लाख, साकोली येथील सेवकराम तवाडे यांच्या मुलाला नोकरी लावून देण्यासाठी १९ लाख ५० हजार रुपये , अशा एकूण पाच जणांकडून ४४ लाख ५० हजार रुपये घेतले होते.
रमेश बावणे आणि रवींद्र कठाणे हे तरुणांना वेकोलि आणि समाजकल्याण विभागात नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या रकमा घेत होत. ही वसुली हर्षल आणि त्याची आई माधुरी वाघमारे यांच्याकडे सोपवित होते. काही जणांनी तर या आरोपींच्या बँक खात्यात पैसे जमा केलेले आहेत. चौकशीसाठी जाणाऱ्यांना ते इतर उमेदवारांचे बोगस नियुक्तीपत्र दाखवायचे. काहींना पैसे परत म्हणून बोगस चेकही आरोपींनी दिले आहेत.
अटक टाळण्यासाठी या तिन्ही आरोपींनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले असता प्रकरण गंभीर असल्याने न्यायालयाने त्यांचे अर्ज फेटाळून लावले. न्यायालयात सरकारच्यावतीने सरकारी वकील प्रफुल्ल कटारिया, आरोपींच्या वतीने ॲड. फुले, मसराम यांनी काम पाहिले. सहायक पोलीस निरीक्षक डी. एस. करांडे हे तपास अधिकारी आहेत.