शिक्षक दिन अंतर्गत
By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST
पंचवटी सार्वजनिक वाचनालयातर्फेआदर्श शिक्षक पुरस्कार
शिक्षक दिन अंतर्गत
पंचवटी सार्वजनिक वाचनालयातर्फेआदर्श शिक्षक पुरस्कारनाशिक : प्रत्येक व्यक्तीने आपल्यातला शिक्षक नेहमी जागरूक ठेवणे आवश्यक आहे. शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञान आणि अध्यापन पद्धती अद्ययावत करणे अपेक्षित आहे, असे मत प्रा. दिलीप धोंडगे यांनी शिक्षक दिनानिमित्त आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाच्या वेळी व्यक्त केेले.पुरस्कार वितरण सोहळ्याअंतर्गत रोहिदास गोसावी, अलका आहिरे, उषा सूर्यवंशी, वैशाली लचके, कल्पना बोरसे, दिलीप निरभवणे, एकनाथ कुलकर्णी आदि शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या गौरव सोहळ्यास के. के. मुखेडकर हे अध्यक्षस्थानी होते. या समारंभास बाबूराव मुखेडकर, प्रकाश वैद्य, लता फोकणे, योगीता भामरे, गोपाळ भडांगे, धनंजय दंडवते आदि उपस्थित होते.फोटो स्कॅनिंगला दिला आहे.कॅप्शन:पंचवटी सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणप्रसंगी पुरस्कारप्राप्त शिक्षकांसह प्रा. दिलीप धोंडगे, के. के. मुखेडकर, नथुजी देवरे, डॉ. सुनील धोंडगे आदि.====================राहुलजी प्राथमिक विद्यामंदिरनाशिक : सिडको मोरवाडी येथील राहुलजी प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर आणि सुहास फरांदे हे अध्यक्ष म्हणून लाभले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदि उपस्थित होते.===========शिशुविहार बालक मंदिरसेंट्रल हिंदू सैनिकी शिक्षण मंडळ संचलित शिशुविहार आणि बालक मंदिर येथे शाळेच्या मुख्याध्यापक साक्षी भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.(फोटो स्कॅनिंगला दिला आहे.)==================नाशिक इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नोलॉजीनाशिक : शिक्षक दिनानिमित्त नाशिक इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नोलॉजी संचलित स्व. अण्णासाहेब पाटील पॉलिटेक्निक महाविद्यालयात शाडूच्या मातीपासून मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यक्रमात मूर्तीकार महेश खोले यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवधर्नाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. मूर्ती घडवताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर विशेष आनंद दिसत होता. या उपक्रमाबद्दल शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी गुलाबपुष्प देऊन शिक्षकांचे आभार मानले. यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालक उपस्थित होते.================एच.पी.टी. महाविद्यालयनाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित एच.पी.टी महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नेहमी विद्यार्थी महाविद्यालयात आपल्या कलागुणांचे सादरीकरण करत असतात, परंतु या शिक्षकदिनी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले.या कार्यक्रमात गायन, नृत्य, काव्याविष्कार आदिंच्या सादरीकरणाने महाविद्यालयातील वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्रा. व्ही. एन. सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या आगळ्या वेगळ्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात प्रा. डॉ. अनिता गोगटे, प्रा. डॉ. वृंदा भार्गवे, प्रा. डॉ. अनिल पठारे, प्रा. डॉ. विजय वाबळे, प्रा. डॉ लीना हुन्नरगीकर, प्रा. आर. आर. निकाळे आदिंनी सहभाग घेतला होता.विद्यापीठ प्रतिनिधी सुरेश नखाते, पुष्कर तिवारी, कोमल भागवत, भक्ती आठवले, संपदा कांबळे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.फोटो: आर फोटो मध्ये०७ एचपीटी टिचर्स डे नावाने सेव्ह आहे.=================शक्ती विकास अकॅडमीनाशिक : शक्ती विकास अकॅडमीमध्ये शिक्षकदिना निमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेत विद्यार्थ्यांचा वर्ग घेतला. अकॅडमीचे प्रा. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षकदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे गुलाब पुष्प देऊन आभार मानले. यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालक उपस्थित होते.===================पेठे विद्यालयनाशिक : रविवार कारंजा येथील पेठे विद्यालयात शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांचा पालक शिक्षक संघातर्फे गौरव करण्यात आला. शिक्षकदिनानिमित्त अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका घेत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदि उपस्थित होते.================नवरचना विद्यालयनाशिक : महाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित नवरचना माध्यमिक विद्यालयात शिक्षकदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किशोर सुधारालयमधील ज्ञानदानाचे कार्य करणार्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक किशोर पालखेडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.(फोटो स्कॅनिंगला दिला आहे.)==================