‘गुरुउत्सव’ कार्यक्रमांत उल्हास नाईक यांचा सत्कार
By admin | Updated: August 11, 2015 00:03 IST
केरी: केरी फोंडा परिसरातील माजी विद्यार्थी तसेच नाट्य कलाकार यांच्यातर्फे येथील सुर्शी केसरबाई केरकर हायस्कुलचे कर्मचारी उल्हास यशवंत नाईक यांचा अभिनव पद्धतीचे एका खास ‘ गुरूउत्सव’ कार्यक्रमाद्वारे सत्कार करण्यात आला. जेष्ठ कवी दि.ना. नायक आणि पालक कालीदास सतरकर यांच्या अध्यक्षतेखाली हा क ार्यक्रम बायणाक देवस्थानच्या सभागृहात मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यात आला.
‘गुरुउत्सव’ कार्यक्रमांत उल्हास नाईक यांचा सत्कार
केरी: केरी फोंडा परिसरातील माजी विद्यार्थी तसेच नाट्य कलाकार यांच्यातर्फे येथील सुर्शी केसरबाई केरकर हायस्कुलचे कर्मचारी उल्हास यशवंत नाईक यांचा अभिनव पद्धतीचे एका खास ‘ गुरूउत्सव’ कार्यक्रमाद्वारे सत्कार करण्यात आला. जेष्ठ कवी दि.ना. नायक आणि पालक कालीदास सतरकर यांच्या अध्यक्षतेखाली हा क ार्यक्रम बायणाक देवस्थानच्या सभागृहात मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी नाईक याना सुमती बाबू तामसे याच्या हस्ते ओवाळण्यात आले. सत्कार मुर्ती उल्हास नाईक हे साद्या राहणी मानाचे जनमानसात सर्वाशी मिळून मिसळून वागणारे प्रेमळ व्यक्तिमत्व असून विद्यार्थ्याना तसेच इतर तरूणाना ते नेहमीच मार्गदर्शन व मदत करीत असतात. गरजवंत विद्यार्थ्यांनाही ते मदत करायचे. त्याना सत्कार सोहळ्याची कोणती ही पूर्व सुचना न देता विद्यार्थी वर्गाने हा कार्याक्रम घडवून आणला होता. कार्यक्रमाची कोणतीही पूर्व सुचना न देता माजी विद्यार्थ्यांनी घडवून आणलेल्या या अविस्मरणीय सोहळ्यात मी भारावून गेलोय या गुणी विद्यार्थ्यामध्ये मला देवाच दर्शन होत आहे. फोटो: ‘ गुरुउत्सव’ कार्यक्रकातील सत्कारमुर्ती उल्हास नाईक त्यांच्या सोबत आयोजक कालीदास सत्कार व कवी दि.ना. नायक