उद्धव ठाकरे आज जळगावात
By admin | Updated: December 20, 2015 00:50 IST
जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकर्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे रविवार, २० रोजी जळगाव जिल्ाच्या दौर्यावर येत आहेत. त्यांच्यासोबत सेनेचे सात मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.
उद्धव ठाकरे आज जळगावात
जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकर्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे रविवार, २० रोजी जळगाव जिल्ाच्या दौर्यावर येत आहेत. त्यांच्यासोबत सेनेचे सात मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. या दौर्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या आमदारांनी शनिवारी दिवसभर तालुकानिहाय दुष्काळीस्थितीचा आढावा घेतला, त्याबाबत जिल्हाधिकार्यांशी सायंकाळी चर्चा केली व तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. रविवारी सकाळी ११ वाजता उद्धव ठाकरे हे तालुक्यांचा दौरा करुन आलेल्या आमदारांकडून आढावा घेतील. त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी दहा हजाराची मदत त्यांच्याहस्ते दिली जाईल. ती दिल्यानंतर दुपारी १२ वाजता सागर पार्क मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्या सभेत उद्धव ठाकरे काय बोलतात, याकडे खान्देशवासीयांचे लक्ष लागून आहे.