शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मनपा व पालिकांच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढणार उद्धव ठाकरे : गुलाबरावांच्या मंत्रीपदाबाबत बोलणे टाळले

By admin | Updated: December 20, 2015 23:56 IST

सेंट्रल डेस्कसाठी (पत्रकार परिषदेची बातमी)

सेंट्रल डेस्कसाठी (पत्रकार परिषदेची बातमी)

जळगाव : आगामी काळात नगरपालिका व महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुका आघाडी करुन नव्हे तर पक्षाच्या चिन्हावरच लढविण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगावात झालेल्या पत्रपरिषदेत सांगितले. आमदार गुलाबराव पाटील यांना मंत्रीपद मिळेल का याबाबत मात्र त्यांनी बोलणे टाळले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेला संवाद प्रश्नोत्तर स्वरूपात असा...
प्रश्न : शिवसेनेच्या दुष्काळी भागातील दौर्‍याकडे राजकीय दौरा म्हणून पाहिले जात आहे. त्याबाबत आपण काय सांगणार?
उद्धव ठाकरे : शासकीय योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहचत आहे किंवा नाही. तसेच शेतकर्‍यांना मदत मिळावी यासाठी आपला दौरा आहे. यापूर्वी मराठवाडा, विदर्भाचा दौरा केला. आता उत्तर महाराष्ट्राच्या दौर्‍यावरआलोआहे. दौर्‍याकडे कोण कसे पाहतो हा ज्याच्या त्याच्या दृष्टीकोनाचा भाग आहे.
प्रश्न : शिवसेना सत्तेत राहून स्वतंत्र फळी उभारण्याचा प्रयत्न करीत आहे का?
उद्धव ठाकरे : आम्ही शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहोत. सध्या तरी आमची विरोधात राहण्याची भूमिका नाही. शिवसेना यंत्रणा म्हणून काम करून शेतकरी हितांसाठी लढणार आहोत.
प्रश्न : पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी हे गुजरातमध्ये वळविले जात आहे. त्यावर सेनेची भूमिका काय?
उद्धव ठाकरे : राज्यातील जे महत्त्वाची कामे आहेत. त्याची चार टप्प्यात वर्गवारी केली आहे.कामाचे स्वरुप आणि त्याला लागणारा वेळ याचा अभ्यास करून प्रश्न सोडविणार आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी हे उत्तर महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी आहे ते त्यांना मिळालेच पाहिजे.
इन्फो-
प्रश्न : आगामी काळातील मनपा व नगरपालिकांच्यानिवडणुका पक्षाच्या चिन्हावर की आघाडी करून लढणार?
उद्धव ठाकरे : सर्व निवडणुका आघाडीकरुननव्हेतरपक्षाच्या चिन्हावर लढविल्या जातील.