थोडक्यात गुन्हेवार्ता
By admin | Updated: July 26, 2015 23:38 IST
तरुणाचा अकस्मात मृत्यू
थोडक्यात गुन्हेवार्ता
तरुणाचा अकस्मात मृत्यू नागपूर : कोतवालीतील मटन मार्केट मागे राहणारे दीपक मनोहरराव देशमाने (वय ४०) हे शनिवारी सायंकाळी बाथरूममध्ये चक्कर आल्याने बेशुध्द पडले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. ---तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या नागपूर : कामठी रोडवर आशीर्वाद अपार्टमेंटमध्ये राहणारे विक्रम शंकरलाल लाहोरी (वय २९) यांनी तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. शनिवारी रात्री ७.४५ वाजता ही घटना घडली. पाचपावली पोलिसांनी विक्रमचे मोठे बंधू नवीन शंकरलाल लाहोरी (वय ३०) यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली. विक्रमच्या आत्महत्येचे कारण शोधले जात आहे.----महिलेचा आकस्मिक मृत्यू नागपूर : हुडकेश्वरमधील सिध्देश्वरी नगर, चिखले ले आऊट येथे राहणाऱ्या रंजना प्रवीण शंभरकर (वय ३२) यांचा शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला. रंजना यांची काही दिवसांपूर्वीच प्रसुती झाली होती. शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास त्यांची अचानक प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. तेथे त्यांचा रात्री ९.१० च्या सुमारास मृत्यू झाला. हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.---