नक्षल्यांच्या बॉम्बस्फोटात दोन जवान जखमी
By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST
रायपूर : छत्तीसगडच्या बिजापूर या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील एमारगुंडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या प्रेशर बॉम्बच्या स्फोटात सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले. एमारगुंडाजवळ जवान कोंबिंग ऑपरेशन राबवीत असताना नक्षल्यांनी हा स्फोट घडविला.
नक्षल्यांच्या बॉम्बस्फोटात दोन जवान जखमी
रायपूर : छत्तीसगडच्या बिजापूर या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील एमारगुंडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या प्रेशर बॉम्बच्या स्फोटात सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले. एमारगुंडाजवळ जवान कोंबिंग ऑपरेशन राबवीत असताना नक्षल्यांनी हा स्फोट घडविला.सुरक्षा दलाचे जवान नक्षल्यांनी पेरून ठेवलेल्या बॉम्बच्या संपर्कात आले आणि बॉम्बस्फोटात जखमी झाले. हेड कॉन्स्टेबल राजेश सेन आणि असिस्टंट कॉन्स्टेबल आशाराम नेताम अशी जखमींची नावे आहेत. या दोघांनाही नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माओवाद्यांनी शुक्रवारी छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमध्ये एक दिवसाचा बंद पाळण्याचे आवाहन केले होते. (वृत्तसंस्था)