शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या आरोपीस दोन वर्षाची शिक्षा

By admin | Updated: January 29, 2016 22:40 IST

जळगाव: खुनाच्या गुन्‘ात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पोलिसाच्या तावडीतून पळालेल्या गोपाळ माधव गायकवाड या आरोपीस कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्ष कैदेची शिक्षा सत्र न्यायालयानेही कायम ठेवली. गायकवाड हा रणजीत भोईटे खून खटल्यातील आरोपी आहे. त्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जळगाव न्यायालयात प्रलंबित असलेल्या फौजदारी खटल्यासाठी त्याला १ ऑक्टोबर २००९ रोजी नाशिक येथून जळगावला आणले होते. दुसर्‍या दिवशी त्याची जळगाव कारागृहात रवानगी करण्यात आली होती. तेथे किडनी स्टोनचे कारण सांगून त्याला ४ ऑक्टोबर २००९ रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यादिवशी बंदोबस्ताला असलेल्या अजीज तडवी या पोलीस कर्मचार्‍याला त्याने रात्री पावणे बारा वाजता शौचास लागल्याचे सांगून बाहेर नेले, तेव्हा त्याला गुंगारा देत त्याने पळ काढला होता. याबाबत ५ ऑक्टोबर रोजी जिल्हा पेठ पो

जळगाव: खुनाच्या गुन्‘ात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पोलिसाच्या तावडीतून पळालेल्या गोपाळ माधव गायकवाड या आरोपीस कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्ष कैदेची शिक्षा सत्र न्यायालयानेही कायम ठेवली. गायकवाड हा रणजीत भोईटे खून खटल्यातील आरोपी आहे. त्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जळगाव न्यायालयात प्रलंबित असलेल्या फौजदारी खटल्यासाठी त्याला १ ऑक्टोबर २००९ रोजी नाशिक येथून जळगावला आणले होते. दुसर्‍या दिवशी त्याची जळगाव कारागृहात रवानगी करण्यात आली होती. तेथे किडनी स्टोनचे कारण सांगून त्याला ४ ऑक्टोबर २००९ रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यादिवशी बंदोबस्ताला असलेल्या अजीज तडवी या पोलीस कर्मचार्‍याला त्याने रात्री पावणे बारा वाजता शौचास लागल्याचे सांगून बाहेर नेले, तेव्हा त्याला गुंगारा देत त्याने पळ काढला होता. याबाबत ५ ऑक्टोबर रोजी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१० मध्ये या खटल्याचे दोषारोप दाखल करण्यात आले होते. मूळ खटल्यात दहा साक्षीदार तपासण्यात आले. १४ सप्टेबर २०११ रोजी कनिष्ठ न्यायालयाने गायकवाड याला दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरुध्द त्याने सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. शुक्रवारी न्या.ए.के.पटनी यांनी २२ जानेवारी रोजी ही शिक्षा कायम ठेवण्याचा निकाल देण्यासह पूर्वीच्या शिक्षेतून ही शिक्षा वगळू नये असे स्पष्ट आदेश दिले आहेत. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी तर आरोपीतर्फे ॲड.विजय दर्जी यांनी काम पाहिले.