शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील पूल दुर्घटनेत दोन बळी

By admin | Updated: May 20, 2017 00:32 IST

येथील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत बळी गेलेल्यांची संख्या तीन झाली आहे. गुरुवारी पदपूल कोसळून सुमारे ७० जण जुवारी नदीत बुडाले होते.

- सुशांत कुंकळयेकर । लोकमत न्यूज नेटवर्कसावर्डे (गोवा) : येथील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत बळी गेलेल्यांची संख्या तीन झाली आहे. गुरुवारी पदपूल कोसळून सुमारे ७० जण जुवारी नदीत बुडाले होते. त्यातील काही पोहून किनाऱ्यावर आले. एकाचा मृतदेह गुरुवारी रात्री व दुसऱ्याचा मृतदेह शुक्रवारी पहाटे सापडला. नदीत आत्महत्या करणाऱ्या युवकाचाही मृतदेह दुपारी सापडला. पूल दुर्घटनेनंतर किमान ३0 जणांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात होती, मात्र तसे आढळलेले नाही. अन्य कोणी बेपत्ता झाल्याची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदविली गेलेली नाही. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी ५.३0 वाजता शोधकार्य तात्पुरते बंद करण्यात आले. त्यापूर्वी नदीत बुडालेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी पुण्यातील नॅशनल डिझॅस्टर रिस्पॉन्स पथकाच्या साहाय्याने दुर्घटनाग्रस्त भागातील नदीचा संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात आला.गुरुवारी रात्री बसवराज मरेनवार या तरुणाचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर पहाटे अडीचच्या सुमारास नौदलाच्या जवानांना अजितकुमार एक्का (२0) याचा मृतदेह सापडला. हे दोघेही त्या कमकुवत लोखंडी पुलावर उभे असताना नदीत कोसळले होते. पहाटे तीनच्या सुमारास शोधकार्य थांबविण्यात आले. शुक्रवारी सकाळी पुन्हा सुरू झालेले शोधकार्य सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होते. दुपारी तीन वाजता शोधकार्याची सूत्रे नॅशनल डिझॅस्टर रिस्पॉन्स पथकाच्या जवानांनी घेतली. सायंकाळी पाच वाजता तटरक्षक दलाच्या जवानांना नदीत उडी मारून आत्महत्या केलेल्या बसय्या संतोष वडाल या तरुणाचा मृतदेह सापडला. बसय्या याने नदीत उडी मारल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान त्याचा शोध घेत होते. तर ही शोधमोहीम पाहण्यासाठी पुलावर मोठी गर्दी उसळली होती. त्याचदरम्यान हा पूल कोसळला होता. गुरुवारी रात्रीपर्यंत ३0 जणांना सुखरूपपणे बाहेर काढल्याचे प्रशासनाने सांगितले.सकाळी नौदलाच्या चेतक हेलिकॉप्टरद्वारेही शोधकार्य चालू होते. दुपारपर्यंत नौदल आणि तटरक्षक दलाच्या जवानांनी शोधकार्य चालू ठेवले होते. केपे तालुक्याचे उपजिल्हाधिकारी प्रशांत शिरोडकर यांनी सायंकाळी शोधकार्य बंद करण्याची सूचना केली. हे शोधकार्य बंद केले असले तरी पुण्यातील नॅशनल डिझॅस्टर रिस्पॉन्सचे पथक शनिवारपर्यंत सावर्डेतच राहणार आहे, असे शिरोडकर यांनी सांगितले.