शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममधून 100 ऐवजी निघाल्या दोन हजाराच्या नोटा

By admin | Updated: January 18, 2017 16:24 IST

बँकेत न जाता सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने रोख रक्कम मिळवण्याची सोय असल्याने गेल्या काही वर्षांत एटीएम बऱ्यापैकी लोकप्रिय झाले आहेत

ऑनलाइन लोकमत 
टोंक (राजस्थान), दि 18 - बँकेत न जाता सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने  रोख रक्कम मिळवण्याची सोय असल्याने गेल्या काही वर्षांत एटीएम बऱ्यापैकी लोकप्रिय झाले आहेत. त्यातही नोटाबंदीनंतर एटीएमच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आपल्याला हव्या असलेल्या रकमेचा आकडा एटीएमवर टाइप केल्यावर तेवढी रक्कम काही क्षणांतच आपल्या हातात पडते, पण एटीएममधून हव्या असलेल्या रकमेपेक्षा कैक पटीनी अधिक रक्कम हातात पडली तर. अशी घटना राजस्थानमध्ये घडली आहे. 
राजस्थानमधील टोंक शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील एटीएममधून तांत्रिक समस्येमुळे 100 रुपयांऐवजी दोन हजार रुपयांच्या नोटा निघू लागल्या. एटीएमवर 100 रुपये टाइप केले तरी दोन हजार रुपये निघत होते. बघता बघता ही बातमी शहरभर पसरली आणि काही वेळातच लोकांनी या एटीएममधून सहा लाख रुपये काढले. या संदर्भातील वृत्त दैनिक जागरणमध्ये प्रकाशित झाले आहे. 
त्याचे झाले असे की,  एटीएममध्ये वेगवेगळ्या नोटांसाठी वेगवेगळे कप्पे असतात, त्या प्रत्येक कप्प्याचा नोटांच्या मूल्यानुसार ठरावीक संकेतांक असतो. त्या संकेतांकानुसार एटीएममधून नोटांचे वितरण होत असते. त्यामुळे समजा दोन हजार रुपयांच्या नोटा चुकून 100च्या नोटांच्या कप्प्यात टाकल्या गेल्यास एटीएमकडून त्या 100 च्या नोटा म्हणूनच विकरित होऊ शकतात.  टोंकमधील बँक ऑफ बडोदाच्या एटीएममध्येही असेच झाले. आणि लोकांना 100 ऐवजी दोन हजार रुपयांच्या नोटा मिळाल्या. आता ज्या लोकांनी यादरम्यान पैसे काढले त्यांना नोटिसा पाठवून बँक ही रक्कम वसूल करण्याची शक्यता आहे.