शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजारांच्या नोटांची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:49 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या असल्या तरी

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या असल्या तरी गेल्या काही दिवसांत या नोटांची चणचण भासू लागली आहे.सर्वसामान्यांसाठी दोन हजार रुपयांच्या नोटा अडचणीच्या ठरल्या होत्या. त्या हातात असतानाही ग्रामीण भागांत त्याचे सुटे मिळणे अवघड होत होते. पण गेल्या काही दिवसांपासून दोन हजार रुपयांच्या नोटांचे व्यवहारातील प्रमाण घटले आहे. अगदी एटीएममधून पैसे काढतानाही दोन हजारांच्या नोटा मिळेनाशा झाल्या आहे. या नोटांच्या टंचाईबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच, रिझर्व्ह बँकेनेच दोन हजार रुपयांच्या नोटा पुरविण्याचे प्रमाण कमी केल्याचे स्पष्ट झाले आहे.मोठ्या रकमेच्या नोटांचे व्यवहारातील प्रमाण कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने जाणीवपूर्वक दोन हजार रुपयांच्या नोटांचा पुरवठा घटवला असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात स्टेट बँक आॅफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी नीरज व्यास यांनी सांगितले की, सध्या रिझर्व्ह बँकेकडून आम्हालाही मोठ्या मूल्याच्या नोटा म्हणून केवळ ५00 रुपयांच्या नोटाच मिळत आहेत.ते म्हणाले की, दोन हजार रुपयांच्या नोटा केवळ खातेदारांकडून काउंटरवर जमा करण्यात येणाऱ्या चलनातून मिळत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. एसबीआयचे देशभरात ५८ हजार एटीएम असून, त्यापैकी काही एटीएममधील दोन हजार रुपयांच्या कॅसेट्सना आता ५00 रुपयांच्या कॅसेटमध्ये रिकॅलिबरेट करण्यात आले आहे. त्यामुळे एटीएममध्ये जास्त रक्कम ठेवता येईल. मात्र याबाबत रिझर्व्ह बँकेकडे विचारणा करण्यात आली असता त्यांच्याकडून उत्तर मिळालेले नाही. गेल्या वर्षी नोटाबंदीत एक हजार रुपयांच्या नोटा बाद झाल्याने बाजारात चलनाची चणचण भासू नये, यासाठी दोन हजार रुपयांच्या नोटा आणण्यात आल्या होत्या. आता दोन हजार रुपयांची टंचाई भासू नये, यासाठी रिझर्व्ह बँकेकडून ५00 रुपयांच्या नोटांचा पुरवठा सुरू आहे. व्यवहारातील मोठ्या मूल्याच्या नोटांवर नियंत्रण ठेवण्यासाठीच रिझर्व्ह बँकेने जाणीवपूर्वक दोन हजार रुपयांच्या नोटा कमी करून ५00 रुपयांच्या नोटा अधिक प्रमाणात आणण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येते. आता रिझर्व्ह बँकेकडून २00 रुपयांच्या नोटाही व्यवहारात आणल्या जाण्याची शक्यता आहे.नव्या नोटा...रिझर्व्ह बँकेने २0 रुपयांच्या नव्या नोटाही लवकरच बाजारात आणण्याचे ठरविले आहे. सध्याच्या नोटेप्रमाणेच ती असेल. तिच्यावर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल.या नव्या नोटा एस मालिकेतील असतील. सध्या चलनात असलेल्या २0 रुपयांच्या नोटा आर मालिकेतील आहेत. या नोटांची छपाई सुरू झाली आहे.