जायकवाडीतील दोन पंप बंद
By admin | Updated: September 22, 2016 01:16 IST
औरंगाबाद : जायकवाडी येथील पाणीपुरवठा योजनेजवळील वीज कंपनीचा एक ट्रान्सफार्मर बुधवारी सकाळी खराब झाला. त्यामुळे शहराची तहान भागविणारे दोन पाणीपुरवठा पंप बंद पडले. औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने पर्यायी व्यवस्था करून पंप सुरू केले. त्यानंतर परत ट्रान्सफार्मर बंद पडला. रात्री उशिरा ट्रान्सफार्मर बदलणे अवघड असल्याने गुरुवारी सकाळी हे काम करण्यात येणार आहे. जायकवाडीतील दोन पंप बंद असल्याने गुरुवारी शहराच्या पाणीपुरवठ्यावर बराच परिणाम जाणवणार आहे. अनेक वसहतींना निर्जळीचा सामना करावा लागेल.