शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये दोन मतदानकेंद्रे पेटवली

By admin | Updated: April 11, 2017 00:14 IST

काश्मीरात पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंसाचार उसळला असून अनंतनाग जिल्ह्यात बुधवारी होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या दोन दिवस अगोदर जमावाने

श्रीनगर : काश्मीरात पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंसाचार उसळला असून अनंतनाग जिल्ह्यात बुधवारी होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या दोन दिवस अगोदर जमावाने येथील मतदान केंद्र असलेल्या दोन शाळांना आग लावली. त्यामुळे येथील निवडणूकच स्थगित करण्याची मागणी पीडीपीच्या उमेदवाराने केली आहे. दरम्यान, बडगाम आणि गंदरबल जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलविलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पीडीपीचे उमेदवार तसदुक मुफ्ती म्हणाले की, परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत येथील निवडणूक स्थगित करण्याची मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे करत आहोत. निवडणूक रद्द करण्याची मागणी करणे म्हणजे मुख्यमंत्री महेबूबा मुफ्ती यांच्या सरकारवरच आरोप करण्यासारखे आहे, असे मत नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केले आहे. उमर यांनी व्टिट केले आहे की, हा तर सरकारच्या अपयशावरच आरोप आहे. भाजप हे पाहू शकत नाही का? (वृत्तसंस्था)घुसखोरी उधळलीकुपवाडा जिल्ह्याच्या केरन सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा अतिरेक्यांचा प्रयत्न उधळून लावत सैन्याने चार अतिरेक्यांना ठार केले. सैन्याच्या प्रवक्त्याने सांगितले की, अतिरेक्यांच्या समूहाने केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरुन घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पण, सुरक्षा दलाने हा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात चार अतिरेकी मारले गेले. या परिसरात शोध मोहिम सुरु आहे. जमाव पांगविण्यासकाश्मीरातील जमावाला पांगविण्यासाठी सुरक्षा दल गुप्त शस्त्रावर सद्या काम करत आहे, अशी माहिती अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली. पॅलेट गनच्या वापराचा बचाव करताना त्यांनी ही माहिती दिली. यापूर्वीचे काही उपाय जमावाला पांगविण्यासाठी उपयोगी पडले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. पॅलेट गनच्या ऐवजी रबराच्या गोळ्यांचीही चाचपणी करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.