शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

अकाली दलामधून दोन आमदार निलंबित

By admin | Updated: July 21, 2016 04:43 IST

आम्हाला लक्ष्य करण्यात आले, असा आरोप शिरोमणी अकाली दलातून निलंबित करण्यात आलेले आमदारद्वय परगतसिंग व इंदरबिरसिंग बोलारिया यांनी बुधवारी केला

जालंधर : जनतेसाठी आवाज उठविल्यानेच आम्हाला लक्ष्य करण्यात आले, असा आरोप शिरोमणी अकाली दलातून निलंबित करण्यात आलेले आमदारद्वय परगतसिंग व इंदरबिरसिंग बोलारिया यांनी बुधवारी केला. पक्षविरोधी कारवायांच्या आरोपांवरून काल या दोघांना पक्षाने निलंबित केले होते. नवज्योतसिंग सिद्धू यांनी भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच ही कारवाई झाल्यामुळे हे दोघे आम आदमी पार्टीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. तथापि, त्यांनी या मुद्यावर बोलणे टाळले. नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पत्नी आमदार नवज्योत कौर यादेखील भाजपातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत.शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबिरसिंग बादल यांनी बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असे सांगत जालंधर छावणीचे आमदार आणि भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार परगतसिंग तसेच अमृतसर दक्षिणचे आमदार इंदरबिरसिंग बोलारिया यांच्या निलंबनाची मंगळवारी घोषणा केली होती.आपल्या निलंबनाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना परगत म्हणाले की, लोकशाहीत सत्य बोलणे व मतदारसंघातील लोकांसाठी आवाज उठविणे या जर पक्षविरोधी कारवाया ठरत असतील, तर मी मान्य करतो की, मी त्या केल्या आहेत. माझ्या मतदारसंघातील लोकांचे मुद्दे मांडल्याबद्दल निलंबनाऐवजी मी बडतर्फीची प्रतीक्षा करीत होतो, असे बोलारिया म्हणाले. या दोघांनी आपापल्या मतदारसंघात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यास विरोध दर्शविला होता. मात्र, आमच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले, असेही या आमदारद्वयांनी सांगितले. माझ्या मतदारसंघातील प्रस्तावित घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प तार्किक व कायदेशीरदृृष्ट्या, तांत्रिकदृष्ट्या आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून योग्य नसून, लोक त्याच्याविरुद्ध आहेत, असे परगत म्हणाले. (वृत्तसंस्था)>पत्ते उघड करण्यास नकारहे दोघेही आपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यांनी त्यांचे पत्ते उघड करण्यास नकार दिला. योग्यवेळ आल्यानंतर मी याबाबत (आपच्या मुद्यावर) बोलेन. ती वेळ येऊ द्या. योग्यवेळी मी प्रत्येक गोष्ट उघड करीन, असे परगत म्हणाले.