शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दोन दहशतवाद्याचा खात्मा, एसएलआर आणि एके-47 जप्त

By admin | Updated: March 26, 2017 17:59 IST

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये पोलिसांच्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला केला. दोन्ही बाजूने गोळीबार झाला. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात पोलिसांना यश आले आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 26 - जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये पोलिसांच्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला केला. दोन्ही बाजूने गोळीबार झाला. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात पोलिसांना यश आले आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याकडून एक एसएलआर आणि एक एके-47 जप्त करण्यात आली आहे. पुढच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात मोठ्या बोगद्याचे उद्घाटन कऱण्यासाठी जम्मू कश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधानांच्या आगमानापुर्वी दहशतवादी हल्ला झाल्यामुळे सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. गेल्या 24 तासात हा दुसरा हल्ला आहे. आज दुपारी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या गस्तीपथकावर हल्ला चढवला. दहशतावाद्याच्या हल्लाला भारतीय पोलिसांनी चोख उत्तर देताना त्यांना यमसदनी पाठवले. त्यानंतर पुलावाच्या संपूर्ण परिसराला सुरक्षा यंत्रणानी वेढा घातला असून अद्याप परिसरात शोधमोहीम सुरु आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवामा आणि अवंतीपोरामधील पोलीस अधीक्षक रईस अहमद, झाहीद मलिक तसेच जिल्ह्यातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंदन कोहली हे तिघे जण गस्तीपथकासोबत जात होते. यादरम्यान गाडीने आलेल्या दहशतवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर गोळीबार केला. पोलिसांनीही तात्काळ दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले आणि दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. पोलिसांनी दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्र ताब्यात घेतली असून दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.