दोन लाखांसाठी विवाहितेस घराबाहेर हाकालले पतीसह सासरच्या सात जणांवर गुन्हा
By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST
अहमदपूर : व्यवसायासाठी माहेरहून दोन लाख रूपये व अर्धा किलो चांदी घेऊन ये म्हणून सासरच्या मंडळींनी एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून घराबाहेर हाकालून दिल्याप्रकरणी अहमदपूर पोलिस ठाण्यात पतीसह सात जणांविरुध्द शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दोन लाखांसाठी विवाहितेस घराबाहेर हाकालले पतीसह सासरच्या सात जणांवर गुन्हा
अहमदपूर : व्यवसायासाठी माहेरहून दोन लाख रूपये व अर्धा किलो चांदी घेऊन ये म्हणून सासरच्या मंडळींनी एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून घराबाहेर हाकालून दिल्याप्रकरणी अहमदपूर पोलिस ठाण्यात पतीसह सात जणांविरुध्द शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़तालुक्यातील फावरा तांडा येथील सुशिलाबाई राठोड (हल्ली मु़ पिंकू तांडा) यांचे पती दत्ता राठोड यांच्यासह सासरच्या सात जणांनी तुला मुल-बाळ होत नाही असे म्हणत शारीरिक व मानसिक छळ करून लाथा-बुक्यांनी मारहाण केली़ तसेच व्यवसायासाठी माहेरहून दोन लाख रूपये व अर्धा किलो चांदी घेऊन ये म्हणून घरातून हाकलून दिले़ त्यामुळे त्या माहेरी गेल्या असत्या माहेरी जाऊन प्रकरण आपसात मिटवण्याच्या बहाण्याने परत बोलावून आणले़ घरी आणल्यानंतर पुन्हा शिवीगाळ करून मारहाण केल्याची फिर्याद सुशिलाबाई राठोड यांनी दिली आहे़ त्यामुळे पती दत्ता राठोड, सासरा गोविंद राठोड, सासू सुंदराबाई राठोड, पुंडलिक राठोड, मदन राठोड, नामदेव राठोड, भारत जाधव (सर्व रा़ धावरा तांडा) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ पुढील तपास पोनि़ कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागटिळक करीत आहेत़