विदर्भ-दुचाकी झाडावर आदळून दोन ठार
By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST
दुचाकी झाडावर आदळून दोन ठार
विदर्भ-दुचाकी झाडावर आदळून दोन ठार
दुचाकी झाडावर आदळून दोन ठारएक गंभीर : लग्नाला जाताना अपघातसावली (चंद्रपूर) : लग्नाला जात असताना दुचाकी झाडावर आदळून दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला. सदर घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गेवराजवळच्या वाघोबा नाल्यावर घडली. तिघेही चकपिरंजी येथील असून या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.या अपघातातील प्रकाश तुकडू शेंडे (२७) व बंडू तुळशीराम बावने (३१) दोघेही रा. चकपिरंजी अशी मृतांची नावे आहेत. मृत प्रकाश शेंडे, बंडू बावने व शबीर शेख फरीद शेख (३५) रा. चकपिरंजी हे आपल्या दुचाकीने गेवरा येथे एका लग्नाला जात होते. वाघोबा नाल्याजवळ एका झाडाला दुचाकीची धडक बसली. यात प्रकाश शेंडे यांचा जागीच मृत्यू झाला तर बंडू तुळशीराम बावने यांचा गडचिरोली येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी शबीर शेख फरीद शेख यांच्यावर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)