श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पीर पंजाल पर्वतराजीला लागून असलेल्या प्रत्यक्ष सीमारेषेच्या पलीकडून पाकिस्तानने सोमवारी रात्री केलेल्या गोळीबारात सुंदरबनी गावात सीमेवर गस्त घालणारे भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले.लष्कराचे प्रवक्ते कर्नल नितीन जोशी यांनी सांगितले की, पाकिस्तानकडून उखळी तोफा व बंदुकांचा मारा होताच भारतीय लष्कराने तत्काळ चोख प्रत्युत्तर दिले.या गोळीबारात रा.फलमन विनोद सिंग (२४ वर्षे) व जकी शर्मा (३०) हे गंभीर जखमी झाले. इस्पितळात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. हे दोन्ही जवान काश्मीरमधील अनुक्रमे अखनूर व हिरानगर येथील रहिवासी होते. दुपारी अखनूर लष्करी इस्पितळात पुष्पचक्र वाहून त्यांना मानवंदना देण्यात आली. (वृत्तसंस्था)
काश्मिरात दोन जवान शहीद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 04:36 IST