कंटेनरच्या धडकेत दोघे जखमी
By admin | Updated: August 20, 2015 22:09 IST
(फोटो - कंटेनर)
कंटेनरच्या धडकेत दोघे जखमी
(फोटो - कंटेनर)कंटेनरच्या धडकेत दोघे जखमीदुचाकीला धडक : कांद्रीजवळील घटनाकन्हान : भरधाव कंटेनरने मोटरसायकलला धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांद्रीजवळील पेट्रोलपंपजवळ गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. मोहम्मद इम्रान वल्द मोहम्मद युनूस (२५) व आवेश अख्तर वल्द जमीर अहमद (२३) दोघेही रा. कामठी अशी जखमींची नावे आहेत. हे दोघेही विना क्रमांकाच्या मोटरसायकलने कामठीहून कन्हान मार्गे भंडारा जिल्ह्यातील तुमसरला जात होते. दरम्यान, कांद्री शिवारातील पेट्रोलपंपजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या एनएल-०१/के-२७५१ क्रमांकाच्या कंटेनरने त्यांच्या मोटरसायकला जोरदार धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. अपघात होताच कंटेनरचालकाने कंटेनर सोडून पळ काढला. माहिती मिळताच कन्हान पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघांनाही कामठी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ भरती केले. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी) ***