शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील दोन ‘भावी’ जिहादींना हैदराबादेत अटक

By admin | Updated: October 24, 2014 03:35 IST

कजण बंदी घातलेल्या ‘सिमी’ संघटनेचा कथित हस्तक आहे तर दुसरा इंडियन मुजाहिदीनच्या अटकेत असलेल्या मन्सूर पीरभॉयचा सहकारी आहे.

हैदराबाद : भारतात दहशतवादी कारवायांसाठी अफगाणिस्तानात जाऊन ‘अल काईदा’कडून जिहादी प्रशिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रातून आलेल्या शाह मुदस्सीर (२५ वर्षे) व शोएब अहमद खान (२४) या दोघांना सिकंदराबाद रेल्वे स्थानकात अटक करण्यात आली.हैदराबाद पोलीस दलाच्या उत्तर परिमंडळाच्या उपायुक्त आर. जयलक्ष्मी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये ही माहिती देताना सांगितले की, यापैकी एकजण बंदी घातलेल्या ‘सिमी’ संघटनेचा कथित हस्तक आहे तर दुसरा इंडियन मुजाहिदीनच्या अटकेत असलेल्या मन्सूर पीरभॉयचा सहकारी आहे.अबु आसीफ आणि कमरान शा हे पाकिस्तानी नागरिक, झाहीद अल हिंद हा अफगाणिस्तानचा नागरिक आणि मिर शौकत, समीर खान व मोहतासीम बिल्ला हे हैदराबादच्या साईदाबाद भागातील रहिवासी यांच्यासोबत भारतात दहशतवादी कारवायांचा कट रचल्याच्या आरोपांवरून या दोघांना अटक करण्यात आली आहे.जयलक्ष्मी यांनी दिलेल्या माहितीनुसार मुदस्सीर व शोएब फेसबूकच्या माध्यमातून हैदराबादमधील वादग्रस्त इस्लामी विद्वान इस्लाही यांचा मुलगा असलेल्या मोहतीशीम बिल्ला याच्या संपर्कात आले. इंटरनेटवरील सोशल नेटवर्क संकेतस्थळांच्या वापरात कुशल असलेले मुदस्सीर व शोएब अशाच प्रकारे पाकिस्तान व अफगामिस्तानच्या काही नागरिकांच्याही संपर्कातआले.फेसबुकवरून चॅट करताना अफगाणिस्तानचा झाहीद अली हिंदी व हैदराबादचा मोहताशीम बिल्ला हे दोघे मुदस्सीर व शोएब यांना जिहादी साहित्य वाचायला सांगून त्यांची डोकी भडकावीत असत. अशाच एका फेसबूक संभाषणात पाकिस्तानच्या कमरान शा याने स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध असलेल्या रसायनांचा उपयोग करून स्फोटके कशी बनवता येतात, याची माहिती या दोघांंना उपलब्ध करून दिली. त्या संभाषणात या साहित्याचा उल्लेख ‘हैद्राबादी बिर्यानी’चे साहित्य असा केला गेला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार बिल्लाच्या बोलावण्यावरून मुदस्सीर व शोएब याआधी ३ सप्टेंबररोजी हैदराबाद येथे आले होते. त्यावेळी भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी अफगाणिस्तानला जाऊन अल-काईदाकडून प्रशिक्षण घेण्यासाठी बिल्लाने या दोघांना चिथावणी दिली.व्हिसा मिळवून देतो व प्रवास खर्चाचीही व्यवस्था करतो, असे आश्वासन देऊन बिल्लाने त्यांना पुन्हा १० आॅक्टोबरला हैदराबादला बोलावले होते.बुधवारी सिकंदराबाद रेल्वे स्थानकात संशयास्पद अवस्थेत फिरत असताना पोलिसांनी मुदस्सीर व शोएबला अटक केली. त्यांच्याकडून मोबाईल फोन, स्फोटके कशी बनवावीत याची माहिती असलेले छापील साहित्य, पेन ड्राईव्ह व दहशतवादी प्रशिक्षणाच्या सीडी, पासपोर्ट व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले. (वृत्तसंस्था)