शेलपिंपळगाव : चाकण-शिक्रापूर महामार्गावरील शेलपिंपळगाव (ता.खेड) हद्दीत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला बसची धडक बसली. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बसचे मोठे नुकसान झाले. वारंवार अशा प्रकारचे अपघात घडूनही प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणो आहे.
चाकण-शिक्रापूर महामार्गावर रात्रीच्यावेळी विनापरवाना मोठय़ा प्रमाणात अवजड वाहने उभी केली जातात. यावर पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अशा घटना अधिकच वाढत आहेत. रात्रीच्या वेळी अवजड वाहने भर रस्त्यात बिनधास्त उभी करून वाहनाचे चालक विश्रंती घेतात. मात्र, या वेळी रस्त्यावरील इतर वाहतुकीला अडथळा होतो.
परिणामी, रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाच्या मागच्या बाजूला वाहतुकीची भरधाव वाहने धडकतात. रविवारी रात्रीच्या सुमारास शेलपिंपळगावनजीक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अवजड कंटेनरला चाकणहून शिक्रापूरकडे जात असलेल्या प्रवासी बसची (एमएच 16 बीसी 117क्) धडक बसली. यात बसचा चालक जखमी झाला. तसेच, बसचे मोठे नुकसान झाले. बेकायदा पार्क केलेल्या वाहनांवर पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)