शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

खडसेंना धमकीप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल आठ दिवसानंतर गुन्हा दाखल : दोघंही तरुण शिवसेनेचे कार्यकर्ते

By admin | Updated: February 22, 2016 00:07 IST

जळगाव: महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करुन धमकी दिल्याच्या प्रकरणात दोघांवर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव: महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करुन धमकी दिल्याच्या प्रकरणात रविवारी सुनील पाटील (रा.मुक्ताईनगर) व आनंद पाटील (रा.जळगाव) या दोघांवर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे जिल्हा चिटणीस भरत तोताराम महाजन (रा.फैजपूर) यांनी फिर्याद दिली आहे. यातील सुनील पाटील हा मुक्ताईनगर येथील शिवसेनेचा कार्यकर्ता तर आनंद पाटील हा मू.जे.महाविद्यालाचा विद्यार्थी आहे.तो शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची नेमकी ओळख स्पष्ट झालेली नाही. सुनील याचा तो फेसबुकवरील मित्र आहे, इतकेच सध्या तरी पुढे आलेले आहे. दरम्यान,१२ व १३ फेब्रुवारी रोजी या दोघांनी फेसबुकवर खडसे यांच्याविरुध्द आक्षेपार्ह मजकुर पोस्ट करुन त्यांना मारुन टाकण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी भाजप पदाधिकार्‍यांनी कारवाईच्या मागणीसाठी पोलीस अधिकारी व तहसीलदारांकडे जिल्हाभर आंदोलने करुन निवेदने दिली होती. चंदेल यांनी स्वत:कडेच ठेवला तपासपोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. आठवडाभराच्या चौकशीअंती रविवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला भादवि कलम १५३ (अ),१२० (ब), ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्‘ाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांनी स्वत:कडेच घेतला आहे. खडसे यांच्याविषयी सोशय मिडियावर आक्षेपार्ह मजकुर अपलोड करण्याची ही तिसरी वेळ आहे. चार महिन्यापूर्वीही त्यांच्या आजारपणाविषयी तसेच बदनामीकारक पोस्ट व्हायरल झाली होती. तर त्याआधी देखील त्यांच्या कार्यक्षमतेविषयी व मुख्यमंत्री पदाबाबत फेसबुकवर पोस्ट टाकण्यात आली होती. दोन्ही वेळा भाजपच्या पदाधिकार्‍यांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. एका प्रकरणात अमळनेर, रावेर व भुसावळ येथील महाविद्यालयीन तरुणांचा सहभाग आढळून आला होता. तेव्हा त्यांच्या पालकांनी खडसे यांची भेट घेवून माफी मागितल्याने वाद मिटला होता.