शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

एकाच गोळीने दोन गुंडांचा खात्मा

By admin | Updated: November 8, 2015 02:06 IST

बंदुकीच्या एकाच गोळीने प्रतिस्पर्धी गुंडांचा बळी घेतल्याची थरारक घटना पश्चिम दिल्लीत नुकतीच घडली. मनोज (२५) आणि दीपक (२४) अशी ठार झालेल्या गुंडांची नावे आहेत.

नवी दिल्ली : बंदुकीच्या एकाच गोळीने प्रतिस्पर्धी गुंडांचा बळी घेतल्याची थरारक घटना पश्चिम दिल्लीत नुकतीच घडली. मनोज (२५) आणि दीपक (२४) अशी ठार झालेल्या गुंडांची नावे आहेत.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपकने मनोजला मागच्या बाजूने मिठी मारून पकडून ठेवले होते व त्याच्या एका साथीदाराने गोळी झाडली. ती मनोजच्या छातीत शिरून दीपकच्या पोटात घुसली. यात दोघेही ठार झाले. विशेष म्हणजे, दोघांना यमसदनी पाठवणारी गोळी देशी बनावटीच्या बंदुकीतून झाडण्यात आली होती. टिळकनगर येथील मनोजच्या घराजवळ ही घटना घडली. एकाच गोळीने दोघांना ठार करून दीपकचा साथीदार पळून गेला. तेथे राहणाऱ्या रहिवाशांनी पोलिसांना ही माहिती दिली. मनोज व दीपक यांना रुग्णालयात हलवले असता तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. दोघांचीही उत्तरीय तपासणी करण्यात आली. मनोजवर दरोड्याचा गुन्हा दाखल होता व तो जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. दीपक हा आपल्या टोळीचा ताबा घेऊ इच्छित आहे, असे त्याच्या कानावर आले होते व तो त्याचा काटा काढण्याची संधी शोधत होता. दोघेही रात्रभर एकमेकांचा शोध घेत होते. बऱ्याच झटापटीनंतर अखेर दीपकने मनोजला धरले व साथीदाराला मनोजवर गोळी झाडण्यास सांगितले होते.पोलिसांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्यावरून गोळी झाडणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.